शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

नोटाबंदीपासून ५०० कामगार वेतनाविना; नवी मुंबईतील द शर्ट कंपनीतील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2018 06:51 IST

सेना, मनसेच्या युनियनच्याही पदरी निराशाच

नवी मुंबई : पावणे येथील गारमेंट कंपनीतील सुमारे ५०० कामगारांना गेल्या दीड वर्षापासून वेतन मिळालेले नाही. नोटाबंदीच्या निर्णयानंतर मोठा तोटा झाल्याच्या कारणावरून कंपनीने कामगारांचे वेतन थकवलेले आहे. यामुळे सदर कामगारांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे.पावणे एमआयडीसी येथील द शर्ट इंडिया कंपनीचे कामगार गेल्या सहा महिन्यांपासून संपावर आहेत. नोटाबंदीच्या काळापासून त्यांना कंपनीने पगार दिलेला नाही, यामुळे मनसे व सेना कामगार युनियनच्या माध्यमातून त्यांनी नाइलाजास्तव संपाचा मार्ग पुकारला आहे. कंपनीने त्यांना वेळोवेळी थकित वेतन देण्याचे आश्वासन देऊन ते पाळलेले नाही. या बाबत कामगारांनी कंपनीच्या मालकांकडे चौकशी केली असता, नोटाबंदीच्या निर्णयानंतर कंपनी तोट्यात गेल्याचे कारण त्यांना सांगण्यात आले; परंतु कंपनीला कामाच्या आॅर्डर मिळत असतानाही त्या नाकारल्या जात होत्या, असा कामगारांचा आरोप आहे. तसेच नोटाबंदीच्या नावाखाली कंपनी बंद करण्याचा कट रचत असल्याचीही शक्यता कामगारांकडून वर्तवली जात आहे. कामगारांनी दोन युनियनमार्फत न्याय मिळवण्याचा प्रयत्न झाला असता, सुरुवातीला चार महिन्यांचे थकित वेतन त्यांना कंपनीतर्फे देण्यात आले. मात्र, त्यानंतर उर्वरित वेतन देण्यास कंपनी असमर्थता दाखवत असल्याने कामगारांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.अनेकांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने दीड वर्षापासून अनेक जण हालाखीचे जीवन जगत आहेत. या कालावधीत बहुतेक जणांनी भविष्यासाठी जमा केलेल्या ठेवीच्या रकमा अथवा बनवलेला ऐवज मोडित काढल्या आहेत. त्यापैकी बहुतांश कामगार निवृत्तीच्या टप्प्यात आहेत. या सर्वांपुढे भविष्याची चिंता सतावत असल्याने त्यांच्याकडून न्याय मिळवण्यासाठी धडपड सुरू आहे. सद्यस्थितीला कंपनीकडून वेतनच मिळत नसल्याने कार्यालयीन कामगार वगळता इतर कामगार गेल्या सहा महिन्यांपासून संपावर आहेत. या सर्वांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली असल्याची खंत कामगार मनोहर जठार व रवि गावकर यांनी व्यक्त केली आहे. याबाबत कंपनीचे मालक अश्विन शेट्टी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता झाला नाही.कंपनीतील ५०० हून अधिक कामगारांचे दीड वर्षांपासूनचे थकित वेतन मिळावे, यासाठी कामगारांचे सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत, त्यानुसार मनसे शहर अध्यक्ष राज ठाकरे यांचीही त्यांनी नुकतीच भेट घेतली. या भेटीत कामगारांनी न्याय मिळवून देण्याचे साकडे घातले, त्यानुसार कंपनी व्यवस्थापनासोबत चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन राज ठाकरे यांनी दिले आहे.

टॅग्स :Demonetisationनिश्चलनीकरणNavi Mumbaiनवी मुंबई