राज्यात पोलीस निरीक्षकांची ५०० पदे रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2020 10:59 AM2020-10-09T10:59:48+5:302020-10-09T11:00:09+5:30

Maharashtra Police पदे रिक्त असल्याने पोलिसांवर कामाचा ताण मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

500 vacancies for police inspectors in the state | राज्यात पोलीस निरीक्षकांची ५०० पदे रिक्त

राज्यात पोलीस निरीक्षकांची ५०० पदे रिक्त

googlenewsNext

- सचिन राऊत

अकोला : राज्यातील पोलीस प्रशासनातील तब्बल ५०० पेक्षा अधिक पोलीस निरीक्षकांची पदे रिक्त असल्याने पोलीस अधिकाऱ्यांवरील ताण वाढल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. यापैकी २५० पदे सहायक पोलीस निरीक्षक यांना पदोन्नती देऊन, विविध न्यायालयीन प्रकरण व सेवाज्येष्ठता यामधून हे पोलीस निरीक्षक पदे भरण्यासाठी हालचाली सुरू करण्यात आलेल्या आहेत. पोलीस निरीक्षकांची पदे रिक्त असल्याने पोलिसांवर कामाचा ताण मोठ्या प्रमाणात वाढला असून, गुन्हेगारीवरही याचा परिणाम होत असल्याचे वास्तव आहे.
राज्यात जुलै महिन्यापर्यंत ४२० पोलीस निरीक्षकांची पदे रिक्त झाली होती. त्यानंतर आॅगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात आणखी सुमारे १०० पेक्षा अधिक पोलीस निरीक्षक सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे राज्यातील पोलीस दलात ५०० पेक्षा अधिक पोलीस निरीक्षकांची पदे रिक्त झाल्याचे वास्तव आहे. त्याचा परिणाम गुन्हेगारीवर होत असल्याने २५० च्या आसपास पोलीस निरीक्षक पदे भरण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षकांना पदोन्नती देण्यात येणार आहे. सहायक पोलीस निरीक्षकांच्या १०० व्या बॅचमध्ये ३११ सहायक पोलीस निरीक्षकांचा समावेश असून, यामधील २५ अधिकाºयांना यापूर्वीच पदोन्नती देण्यात आलेली आहे. त्यामुळे उर्वरित अधिकाºयांच्या पदोन्नतीनंतर रिक्त असलेल्या ५०० पोलीस निरीक्षकांच्या जागेवर या सहायक पोलीस निरीक्षकांना पदोन्नती देण्यात येणार आहे. ही प्रक्रिया मार्च महिन्यात सुरू करण्यात आली होती; मात्र अचानकच कोविड-१९ आजाराने थैमान घातल्यामुळे लॉकडाऊन लावण्यात आले आणि ही पदोन्नतीची प्रक्रिया थांबली. त्यामुळे या तीन महिन्याच्या कालावधीत आणखी काही पोलीस निरीक्षक सेवानिवृत्त झाले असून, त्याचाही ताण कार्यरत असलेल्या पोलीस अधिकाºयांवर आला आहे.
 
१०० पोलीस निरीक्षक आणखी होणार कमी
राज्यात पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या १०० पेक्षा अधिक पोलीस निरीक्षकांना शहर पोलीस उप-अधीक्षक (उपविभागीय पोलीस अधिकारी) या पदावर पदोन्नती मिळणार आहे. त्यामुळे या १०० पोलीस निरीक्षकांची आणखी पदे रिक्त होणार आहेत, त्यामुळे राज्यात पदोन्नतीच्या प्रकियेनंतरही सुमारे २०० पोलीस निरीक्षकांची पदे रिक्त राहण्याची शक्यता आहे.
 
पीएसआय ते एपीआय यांचीही पदोन्नती थांबली
कोविड-१९ मुळे पोलीस उप-निरीक्षक दर्जाच्या अधिकाºयांना सहायक पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नती देण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे; मात्र मार्च महिन्यापासून ही प्रक्रियादेखील थांबली असल्याचे वास्तव आहे.

 

Web Title: 500 vacancies for police inspectors in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.