एलबीटीद्वारे ४ महिन्यांत पालिकेला ५०० कोटींचे उत्पन्न
By Admin | Updated: August 5, 2016 00:58 IST2016-08-05T00:58:22+5:302016-08-05T00:58:22+5:30
महापालिकेला एप्रिल ते जुलै २०१६ या ४ महिन्यांच्या कालावधीमध्ये एलबीटीतून ४९६ कोटी १४ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

एलबीटीद्वारे ४ महिन्यांत पालिकेला ५०० कोटींचे उत्पन्न
पुणे : महापालिकेला एप्रिल ते जुलै २०१६ या ४ महिन्यांच्या कालावधीमध्ये एलबीटीतून ४९६ कोटी १४ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. आतापर्यंतचे पहिल्या ४ महिन्यातील हे सर्वाधिक उत्पन्न आहे.
राज्य शासनाने जकात बंद करून २०१३ पासून एलबीटी लागू केली. त्यानंतर आॅगस्ट २०१५ मध्ये एलबीटी अंशत:
बंद करून महापालिकांना एलबीटीपोटी अनुदान देण्यास सुरुवात केली आहे. ज्या व्यापाऱ्यांची वार्षिक उलाढाल ५० कोटींपेक्षा कमी आहे, त्यांना एलबीटीतून सूट देण्यात आली आहे.
महापालिकेला २०१६ मध्ये एप्रिलमध्ये १०८ कोटी रूपये, मेमध्ये १०७ कोटी, जूनमध्ये १७५ कोटी, जुलैमध्ये १०४ कोटी रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे. २०१५ मध्ये या ४ महिन्यांच्या कालावधीत ३५१ कोटी रूपयांचे उत्पन्न मिळाले होते. २०१४ मध्ये ४१४ कोटी रूपयांचे तर २०१३ मध्ये २४० कोटी रूपयांचे उत्पन्न मिळाले होते.
एलबीटीपोटी एप्रिल ते जुलै महिन्यात मिळालेल्या उत्पन्नामध्ये राज्य शासनाकडून ३११ कोटी रूपयांचे अनुदान, मुद्रांक शुल्कावरील एक टक्का एलबीटी अधिभारापोटी ६५ कोटी व निव्वळ एलबीटीपोटी ११८ कोटी रूपयांचे उत्पन्न पालिकेला मिळाले आहे.
(प्रतिनिधी)