५०० कोटींचा बँकिंग व्यवसाय ठप्प
By Admin | Updated: November 13, 2014 00:58 IST2014-11-13T00:58:21+5:302014-11-13T00:58:21+5:30
वेतनवाढ आणि अन्य प्रलंबित मागण्यांसाठी विविध बँकांचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी बुधवारी पुकारलेल्या एक दिवसीय संपामुळे नागपुरात जवळपास ५०० कोटींचा बँकिंग व्यवसाय ठप्प झाला.

५०० कोटींचा बँकिंग व्यवसाय ठप्प
संप यशस्वीतेचा संघटनांचा दावा : वेतनवाढीची मागणी
नागपूर : वेतनवाढ आणि अन्य प्रलंबित मागण्यांसाठी विविध बँकांचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी बुधवारी पुकारलेल्या एक दिवसीय संपामुळे नागपुरात जवळपास ५०० कोटींचा बँकिंग व्यवसाय ठप्प झाला. धनादेशांचे क्लिअरिंग आणि नियमित व्यवसायाला फटका बसला.
युनायटेड फोरम आॅफ बँक युनियन्सच्या नेतृत्वात १२ नोव्हेंबरला झालेल्या एक दिवसीय अखिल भारतीय संपामुळे नागपुरातील सर्वच राष्ट्रीयकृत बँकांचे व्यवहार ठप्प राहिले. नागपूर चॅप्टर आॅफ यूएफबीयू अंतर्गत विदर्भ आणि मराठवाडा येथील सार्वजनिक क्षेत्रातील शाखा येतात. १ नोव्हेंबर २०१२ पासून प्रलंबित वेतन करारासाठी संपाचे आवाहन करण्यात आले. युनियन्सचे संयोजक रामकुमार गुप्ता यांनी सांगितले की, अखिल भारतीय बँक महासंघाच्या वेळकाढू धोरणामुळे संप करावा लागला. सर्व बँकांचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपापल्या बँकांसमोर निदर्शने केल्यानंतर बँक आॅफ इंडियाच्या मुख्य शाखेसमोर एकत्रित झाले आणि व्यवस्थापनाविरोधात घोषणा दिल्या. ईस्टर्न महाराष्ट्र बँक एम्प्लॉईज असोसिएशचे अध्यक्ष आणि संयोजक राजकुमार गुप्ता यांनी सभेचे संचालन केले.
सभेत एआयबीईएचे बी.एन.जे. शर्मा, एआयबीओसीचे डी.एस. मिश्रा, एनसीबीईचे मनोहर अगस्ती, बीईएफआयचे व्ही.व्ही. असाई, एआयबीओएचे पी.एस. कोहळे, आयएनबीईएफचे नागेश दंडे, एनओबीडब्ल्यूचे राजीव पांडे, प्रकाश सोहनी व अशोक जुननकर, एआयआरबीएफचे ओ.पी. वर्मा, डी.एस. लहाने, अभयसिंग यांनी सभेत मार्गदर्शन केले. यावेळी ईस्टर्न महाराष्ट्र बँक एम्प्लॉईज असोसिएशनचे पदाधिकारी रमेश देशपांडे, सुरेश बोबाटे, सुधीर कुडुले, स्वयंप्रकाश तिवारी, गुणवंत बुजाडे, वंदना मजूमदार, विद्या जोशी, प्रदीप गौर, पी.जी. मेश्राम, अरविंद कुराडकर, मिलिंद वासनिक, अशोक अतकरे, विजय ठाकूर, किशोर बिरेवार, दर्शन नायडू, मालिनी दळवी, ब्रिजबाला दिद्दी, दिलीप पोटले, सत्यशील रेवतकर, जयवंत गुर्वे, सुरभी शर्मा, वीरेंद्र गेडाम, चेंडिल अय्यर, सुरेश सेलूकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)