१२ वर्षाच्या मुलीवर ५० वर्षाच्या इसमाचा बलात्कार
By Admin | Updated: June 10, 2014 01:02 IST2014-06-09T23:05:23+5:302014-06-10T01:02:31+5:30
वडिलांच्या ५० वर्षांच्या मित्राने भरदिवसा सकाळी १०.३० वाजता घरी कोणी नसल्याचा फायदा उठवून बळजबरीने अत्याचार केल्याची घटना घडली आहे.

१२ वर्षाच्या मुलीवर ५० वर्षाच्या इसमाचा बलात्कार
उल्हासनगर : हिललाइन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नेवाळी फाटा येथे राहणार्या १२ वर्षांच्या मुलीवर वडिलांच्या ५० वर्षांच्या मित्राने भरदिवसा सकाळी १०.३० वाजता घरी कोणी नसल्याचा फायदा उठवून बळजबरीने अत्याचार केल्याची घटना घडली आहे. अत्याचार करतांना मुलीची आई घरी आल्याने आरोपी राम चिकणकर याने पळ काढला. मुलीची आई वेळीच आल्याने घडलेला प्रकार उघड झाला असून, मुलीच्या तक्रारीवरून हिललाइन पोलिसांनी आरोपी राम चिकणकर याला अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनजंय धोपावकर यांनी दिली. गेल्याच आठवड्यात सावत्रबापाने ३ वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली होती. (प्रतिनिधी)