ज्येष्ठ नागरिकाला ५० हजारांचा गंडा
By Admin | Updated: September 19, 2016 00:48 IST2016-09-19T00:48:26+5:302016-09-19T00:48:26+5:30
ज्येष्ठ नागरिकाच्या खात्यामधून ५० हजार रुपये काढून घेण्यात आल्याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

ज्येष्ठ नागरिकाला ५० हजारांचा गंडा
पुणे : बॅँकेचा अधिकारी बोलत असल्याची बतावणी करीत एटीएम कार्डाची माहिती विचारून ज्येष्ठ नागरिकाच्या खात्यामधून ५० हजार रुपये काढून घेण्यात आल्याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
अनिल बालकृष्ण डावरे (वय ६७, रा. चैतन्यनगर, धनकवडी) यांनी फिर्याद दिली आहे. संतोष पांडे असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव
आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पांडे याने डावरे यांना जुलै महिन्यात फोन करून, मी बँकेच्या एटीएम विभागाचा अधिकारी बोलत असल्याची बतावणी केली. त्यांच्याकडून एटीएम कार्डाची माहिती विचारून घेत खात्यामधून ५० हजारांची रक्कम आॅनलाईन व्यवहार करून परस्पर काढून घेतली. तर दुसऱ्या प्रकरणात बँक खात्याची माहिती मिळवत आॅनलाईन व्यवहाराद्वारे सहा हजारांची रक्कम काढून आर्थिक फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. जुलियस जोसेफ सांगळे (वय ३५, रा. गलांडे वस्ती, वडगाव शेरी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. वडगावशेरी येथे शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास हा प्रकार घडला. (प्रतिनिधी)