राष्ट्रीय मेळाव्यात ५० हजार भाविक
By Admin | Updated: May 7, 2017 03:44 IST2017-05-07T03:44:35+5:302017-05-07T03:44:35+5:30
अखिल भारतीय श्री स्वामी सेवा मार्ग दिंडोरीच्या वतीने घाटकोपर येथे शनिवारी राष्ट्रीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते

राष्ट्रीय मेळाव्यात ५० हजार भाविक
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अखिल भारतीय श्री स्वामी सेवा मार्ग दिंडोरीच्या वतीने घाटकोपर येथे शनिवारी राष्ट्रीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. रेल्वे पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर झालेल्या मेळाव्यात ५० हजारांहून अधिक भाविक व अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे प्रमुख गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी सपत्नीक श्री सिद्ध लक्ष्मी कुबेर यंत्राचे पूजन केले.
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी सक्षम व्हावी, येथील जनता आर्थिकरित्या सुखी, संपन्न व्हावी यासाठी मुंबादेवीस सामुदायिक पूजन करण्यात आल्याचे सेवा मार्गाच्या वतीने सांगण्यात आले. गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता, पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर आणि मराठा महासंघाचे शशिकांत पवार उपस्थित होते. सोहळ््यासाठी आकर्षक व्यासपीठ उभारण्यात आले होते. सकाळी १०.३० पर्यंत लक्ष्मी कुबेर यंत्र पूजन झाले. भ्रष्टाचार, दहशतवाद आणि दुष्काळाचे संकट दूर व्हावे, शेतकरी आत्महत्या बंद होण्यासाठी शेतकऱ्यांना स्थैर्य देण्यासाठी राष्ट्रीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
समर्थ सेवा मागार्तून विनाहुंडा सामुदायिक विवाह, आयुर्वेद आरोग्य, आध्यात्मिक शेती यांचा आढावा गुरुमाऊंलीनी घेतला. आगामी १९ व २० मे रोजी स्वामी समर्थ दरबार स्थापन करण्यात येणार असून २१ मे रोजी नरसोबावाडी येथे भूमिपूजन सोहळ््याचे आयोजन करण्यात आले आहे.