‘अपंगांच्या शाळांमध्ये ५० टक्के आरक्षण’
By Admin | Updated: June 29, 2015 02:00 IST2015-06-29T02:00:55+5:302015-06-29T02:00:55+5:30
अंध, अपंगांच्या शाळांमध्ये शिक्षक भरती करताना ५० टक्के आरक्षण ठेवले जाईल, असे आश्वासन सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी दिले.

‘अपंगांच्या शाळांमध्ये ५० टक्के आरक्षण’
पुणे : महाराष्ट्रातील अंध, अपंगांच्या शाळांमध्ये मुलांच्या वेदना, संवेदना जाणणारेच शिक्षक असले पाहिजेत, ही अंध-अपंगांची मागणी रास्त आहे. त्यामुळे या शाळांमध्ये शिक्षक भरती करताना ५० टक्के आरक्षण ठेवले जाईल, असे आश्वासन सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी दिले.
‘यशदा’मध्ये रविवारी झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली. ते म्हणाले, अंध-अपंग बांधवांच्या समस्यांची जाण असलेली शिक्षक मंडळी विद्यार्थ्यांना चांगली दिशा देऊ शकतील. त्यामुळे अपंग कल्याण विकास महामंडळ याबाबतचा प्रस्ताव येत्या महिनाभरात तयार करेल. त्यानंतर लगेचच मंत्रिमंडळाच्या बैठकीत तो मंजूर केला जाईल. महाराष्ट्रात अंध, अंपग, मूकबधिर आणि मतिमंद या प्रकारातील तब्बल ८५० अनुदानित शाळा आहेत.
सामाजिक न्याय राज्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेचे स्वागतच आहे. मात्र, या निर्णयाची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. याबाबत नुकतेच अपंग कल्याण आयुक्तांना माहिती अधिकारात पत्र दिले आहे. मात्र, माहितीच मिळालेली नाही.
- धर्मेंद्र सातव, प्रहार अपंग क्रांती आंदोलन, प्रदेशाध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र