शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
3
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
4
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
5
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
6
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
7
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
8
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
9
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
10
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
11
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
12
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
13
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
14
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
15
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
16
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
17
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
18
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
19
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
20
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात

‘व्हॅलेंटाइन डे’ ला मावळातून ५० लाख गुलाब जाणार सातासमुद्रापार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2020 1:22 PM

प्रेमाचे प्रतीक असलेला गुलाब ‘व्हॅलेंटाइन डे’करिता सज्ज

ठळक मुद्देशेवटच्या चार दिवसांत देशांतर्गत बाजारपेठेतही गुलाब रवाना होणार टॉप सिक्रेट नावाच्या लाल रंगाच्या गुलाबाला विदेशी बाजारात मोठी मागणी विदेशी तसेच देशी बाजारपेठेत फुलांना चांगला भाव मिळेल ही सर्व शेतकऱ्यांची अपेक्षा

विशाल विकारी - लोणावळा : प्रेमाचे प्रतीक असलेला गुलाब ‘व्हॅलेंटाइन डे’करिता सज्ज झाला आहे. मावळ तालुक्यात गुलाब फुलांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. व्हॅलेंटाइन डे जेमतेम १० दिवसांवर आल्याने मावळातील गुलाब परदेशी बाजारपेठेत पाठविण्याकरिता फूल उत्पादक शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. सुमारे ५० लाख गुलाबांची निर्यात होणार आहे. तसेच शेवटच्या चार दिवसांत देशांतर्गत बाजारपेठेतही गुलाब रवाना होणार आहे.टॉप सिक्रेट नावाच्या लाल रंगाच्या गुलाबाला विदेशी बाजारात मोठी मागणी आहे. मावळ तालुक्यात सुमारे साडेसहाशे एकरपेक्षा अधिक क्षेत्रांवर पॉलीहाऊसच्या माध्यमातून गुलाब फुलांचे उत्पादन घेतले जाते. परदेशी बाजारात ‘व्हॅलेंटाइन डे’करिता गुलाब फुलांना मोठी मागणी असल्याने परदेशात जवळपास साठ टक्के फुले ही मावळातून निर्यात केली जातात. या वर्षी वातावरणात सतत बदल होत असल्याने त्याचा काही प्रमाणात फूल उत्पादनावर परिणाम झाला आहे.........विदेशी तसेच देशी बाजारपेठेत फुलांना चांगला भाव मिळेल ही सर्व शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. पवना फूल उत्पादक संघाच्या माध्यमातून पवन मावळात चंद्रकांत कालेकर, ज्ञानेश्वर ठाकर, ज्ञानेश्वर आडकर, विश्वनाथ जाधव व मुकुंद ठाकर या पाच शेतकऱ्यांनी एकत्र येत पॉली हाऊसमधील माल विदेशी बाजारपेठेत विक्री करण्याची स्वतंत्र यंत्रणा तयार केली आहे. त्या माध्यमातून काम केले जाते. वाघू मोहोळ, सतीश मोहोळ व सचिन मोहोळ यांनीदेखील पॉलीहाऊसच्या माध्यमातून गुलाब फुलांचे उत्पादन घेतले आहे. तळेगाव एमआयडीसी परिसरात शिवाजी भेगडे यांच्यासह काही शेतकरी मोठ्या प्रमाणात गुलाब फुलांचे उत्पादन घेतात.४तालुक्यातील फूल उत्पादक शेतकरी वर्षभर गुलाब फुलांचे उत्पादन घेत असतात. ‘व्हॅलेन्टाइन डे’ला गुलाब फुलांना सर्वाधिक मागणी असल्याने या काळात जास्तीत जास्त गुलाब फुलांचे उत्पादन कसे होईल, याकरिता डिसेंबर महिन्यापासून शेतकरी नियोजन करतात..........

* टॉप सिक्रेट (लाल रंग), गोल्ड स्टाइक (पिवळा), आवलॉच (पांढरा), ट्रॉपिकल अ‍ॅमेझॉन (नारंगी)* विदेशी बाजारपेठा : जपान व हॉलंड या प्रमुख बाजारपेठा.* स्थानिक बाजारपेठा : दिल्ली ही मुख्य बाजारपेठ.यासह मुंबई, इंदूर, सुरत, अहमदाबाद, बडोदा, पुणे, जयपूर,       लखनौ, जबलपूर, हैदराबाद व गोवा.

टॅग्स :mavalमावळValentine Dayव्हॅलेंटाईन्स डेrelationshipरिलेशनशिप