ठाण्यात ५० लाखांच्या जुन्या नोटा जप्त
By Admin | Updated: March 1, 2017 05:45 IST2017-03-01T05:45:55+5:302017-03-01T05:45:55+5:30
हजार-पाचशे रुपयांच्या ५० लाखांच्या नोटा ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट १ने जप्त करून एका ताब्यात घेतले आहे
_ns.jpg)
ठाण्यात ५० लाखांच्या जुन्या नोटा जप्त
ठाणे : भारतीय चलनातील रद्द झालेल्या जुन्या एक हजार-पाचशे रुपयांच्या ५० लाखांच्या नोटा ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट १ने जप्त करून एका ताब्यात घेतले आहे. त्याची चौकशी आयकर विभागामार्फत सुरू असून, दोन दिवसांपूर्वीही ठाणे गुन्हे शाखेने ४६ लाखांच्या जुन्या नोटा जप्त केल्या होत्या, अशी माहिती पोलिसांनी दिली.
ठाण्यातील गोल्डन डाईजनाका येथे मोटारसायकलवरून एक जण पाचशे आणि एक हजारांच्या जुन्या नोटा घेऊन येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांना मिळाली होती. त्यानुसार, सोमवारी रात्री सापळा रचून कांजूरमार्ग येथे मोटारसायकलवरून आलेल्या एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता, त्यांच्याकडून एक हजाराच्या ५ तर ५०० रुपयांच्या ९,९९० नोटा अशी एकूण ५० लाखांची रक्कम जप्त केली आहे. तत्पूर्वी शनिवारी ठाणे गुन्हे शाखेने जांभळीनाका परिसरातील तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून १ हजाराच्या २,४५० तर पाचशेच्या ४,३०० अशी एकूण ४६ लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. या दोन्ही कारवायांप्रकरणी आयकर विभाग चौकशी करीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. (प्रतिनिधी)