ट्रक उटल्याने ५० गुरांचा मृत्यू
By Admin | Updated: March 30, 2017 00:21 IST2017-03-30T00:21:26+5:302017-03-30T00:21:26+5:30
बारा चाकी ट्रक उलटून ५० गुरांचा मृत्यू झाल्याची घटना पाल (ता. रावेर) येथील बाजार समितीच्या

ट्रक उटल्याने ५० गुरांचा मृत्यू
ऑनलाइन लोकमत
रावेर (जि. जळगाव), दि. 30 - बारा चाकी ट्रक उलटून ५० गुरांचा मृत्यू झाल्याची घटना पाल (ता. रावेर) येथील बाजार समितीच्या वसुली नाक्याजवळ बुधवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली. यानंतर संतप्त ग्रामस्थांनी ट्रक पेटवून दिला.
मध्यप्रदेशातून आलेल्या या ट्रकमध्ये (आरजे ०९-जी ४७०१) ८० ते १०० गुरे भरण्यात आली होती. अतिभार व घाट असल्याने वाहनचालकाचा ताबा सुटल्याने ट्रक उलटला. घटना समजताच ग्रामस्थांनी प्रचंड गर्दी केली. वाहनचालक पसार झाला. ट्रकमधील काही गुरे गुदमरून मरण पावली तर काही गुरे बाहेर काढण्यात आली. यानंतर जमावाने ट्रक पेटवून दिला. या घटनेनंतर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. (प्रतिनिधी)