ओशिवारामध्ये कारने दिलेल्या धडकेत ५ वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू

By Admin | Updated: April 4, 2016 07:55 IST2016-04-04T07:55:21+5:302016-04-04T07:55:21+5:30

ओशिवारा परिसरात कारने दिलेल्या धडकेत 5 वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. संदीप कोळेकर असं मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे

5 years old chicks death in Oshiwara's car | ओशिवारामध्ये कारने दिलेल्या धडकेत ५ वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू

ओशिवारामध्ये कारने दिलेल्या धडकेत ५ वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू

>ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. ४ - ओशिवारा परिसरात कारने दिलेल्या धडकेत 5 वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. संदीप कोळेकर असं मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे. कुटुंबियांसोबत रस्ता ओलांडत असताना कारने दिलेल्या धडकेत संदीप कोळेकरचा मृत्यू झाला आहे. अपघात झाला तेव्हा संदीप कोळेकरसोबत त्याची आजी, आजोबा आणि आईदेखील होते. 
 
संदीप कोळेकर कुटुंबियांसोबत आनंदनगरच्या रस्त्याने घरी परतत असताना मागून येणा-या कारने या कुटुंबाला जोरदार धडक दिली. कारने दिलेल्या धडकेमुळे संदीप कोळेकर लांब फेकला गेला. संदीपला रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. अपघातात संदीपचे आजोबा गंभीर जखमी झाले असून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. पोलिसांनी कारचालक इंद्रजित मरोल याला ताब्यात घेतलं आहे. इंद्रजित बेदरकारपणे कार चालवत असल्याने अपघात झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला असून चौकशी करत आहेत. 
 

Web Title: 5 years old chicks death in Oshiwara's car