मुंबईत शाळेची भिंत कोसळून 5 वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2017 20:54 IST2017-02-01T20:35:44+5:302017-02-01T20:54:23+5:30
अॅण्टॉपहील येथे शाळेच्या प्रवेशद्वाराचा स्लॅब कोसळून झालेल्या अपघातात ५ वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

मुंबईत शाळेची भिंत कोसळून 5 वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 1 - अॅण्टॉपहील येथे शाळेच्या प्रवेशद्वाराचा स्लॅब कोसळून झालेल्या अपघातात ५ वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये तिघे जण जखमी झाले आहेत. मुस्कान खान असे मृत चिमुरडीचे नाव असून ती केजीमध्ये शिकत होती.
सायन कोळीवाडा परिसरात मुस्कान आई वडीलांसोबत राहायची. येथील जी.टी.बी. नगरच्या सनातम धर्म हायस्कुलमध्ये शिशूवर्गात शिकत होती.
बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास शाळा सुटतेवेळीच अचानक शाळेच्या प्रवेशद्वाराजवळील भिंतीचा स्लॅब कोसळला. या अपघातात मुस्कानला शाळेतून घरी नेण्यासाठी आलेली आई आणि मुस्कान त्यात जखमी झाली. त्यांना बाहेर काढण्यात आले. मात्र, आईच्या कुशीत अडकलेल्या मुस्कानने आधीच प्राण सोडले होते. त्यांना तत्काळ सायन रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे मुस्कानला मृत घोषित करण्यात आले. तर आईवर उपचार सुरु आहेत. त्यांच्यासह अन्य दोन विद्यार्थी यामध्ये जखमी झाले.
या घटनेमुळे या परिसरात एकच तणावाचे वातावरण निर्माण झाले आहेत. याप्रकरणी अॅण्टॉपहील पोलीस अधिक तपास करत आहेत.