बेकायदा जमाव जमविल्याने ५ जणांवर गुन्हा

By Admin | Updated: April 29, 2016 01:08 IST2016-04-29T01:08:03+5:302016-04-29T01:08:03+5:30

मोटारीच्या काचा फोडल्याप्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

5 people guilty of illegal activities | बेकायदा जमाव जमविल्याने ५ जणांवर गुन्हा

बेकायदा जमाव जमविल्याने ५ जणांवर गुन्हा

पुणे : बेकायदेशीर जमाव जमवून दंगा घालून मोटारीच्या काचा फोडल्याप्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सिंहगड रस्त्यावर पानमळा येथे घडली आहे. आशा नंदकुमार पाटील, मोनिका संदीप कुटे, अश्विनी जाधव, स्नेहल विक्रांत निकम आणि पुष्कर नंदकुमार पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी दीपा वसंत करमरकर यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी या दि. २२ एप्रिल रोजी रात्री ९.३० च्या सुमारास राहत्या घरी होत्या.
त्यावेळी त्यांच्या घराच्या पहिल्या मजल्यावरील लोखंडी दरवाजाला कोणीतरी जोरात वाजविल्याचा आवाज आला. ते पाहण्यासाठी फिर्यादी गॅलरीत गेल्या असता चार महिलांसह पाच जण इमारतीच्या मोकळ्या जागेत उभे होते. कोण आहे, असे विचारले असता त्यांच्या दिशेने दगड फेकण्यात आला. त्यानंतर पाच जणांनी बेकायदेशीर जमाव जमवून त्यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांच्या वडिलांच्या मोटारीच्या काचा फोडून नुकसान केले, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 5 people guilty of illegal activities