मुंबईत स्वाइनचे आणखी ५ रुग्ण
By Admin | Updated: February 10, 2015 02:47 IST2015-02-10T02:47:36+5:302015-02-10T02:47:36+5:30
मुंबईत सोमवारी स्वाइन फ्लूचे ५ नवीन रुग्ण आढळले असून, रुग्णांची संख्या २०वर गेली आहे. तर, स्वाइन फ्लूच्या उपचारासाठी अजून ३

मुंबईत स्वाइनचे आणखी ५ रुग्ण
मुंबई : मुंबईत सोमवारी स्वाइन फ्लूचे ५ नवीन रुग्ण आढळले असून, रुग्णांची संख्या २०वर गेली आहे. तर, स्वाइन फ्लूच्या उपचारासाठी अजून ३ रुग्ण मुंबईत दाखल झाले आहे. त्यातील ठाण्यातील ३०वर्षीय महिलेची प्रकृती गंभीर असून, एका खासगी रुग्णालयात तिला व्हेंटिलेटरवर ठेवले आहे, अशी माहिती महापालिकेकडून मिळाली.
सध्या मुंबईतील आणि मुंबईबाहेरचे रुग्ण मिळून मुंबईत स्वाइन फ्लूचे ५० रुग्ण उपचार घेत आहेत. नागपूरमध्ये स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या ८५वर गेली आहे. मुंबई महापालिकेने जनजागृती मोहीम राबवली आहे. याचबरोबरीने खासगी रुग्णालयांच्या संपर्कात राहून तिथे येणाऱ्या रुग्णांची माहितीदेखील घेतली जात आहे. (प्रतिनिधी)