मारेकऱ्यांची माहिती देणाऱ्यांना ५ लाख
By Admin | Updated: March 2, 2017 00:58 IST2017-03-02T00:58:01+5:302017-03-02T00:58:01+5:30
केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि विशेष गुन्हे शाखेने (एससीबी) ५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

मारेकऱ्यांची माहिती देणाऱ्यांना ५ लाख
पुणे : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खूनप्रकरणातील आरोपी सारंग दिलीप अकोलकर आणि विनय बापू पवार यांची माहिती देणाऱ्यांसाठी केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि विशेष गुन्हे शाखेने (एससीबी)
५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
२० आॅगस्ट २०१३ रोजी सकाळी सव्वासातच्या सुमारास डॉ. दाभोलकर यांची ओंकारेश्वर मंदिराजवळील शिंदे पुलावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मोटारसायकलवरून आलेले २ संशयित सारंग अकोलकर (वय ३५) आणि विनय बाबूराव पवार (वय ३७) यांनी केल्याचे सीबीआयच्या प्रकटनात म्हटले आहे. या संशयितांची माहिती कोणाला मिळाल्यास किंवा ते कोणाच्या पाहण्यात असल्यास त्यांनी केंद्रीय गुप्तचर विभागाच्या व मुंबईच्या विशेष गुन्हे शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन सीबीआयचे तपास अधिकारी एस. आर. सिंग यांच्याशी ८४२५८३२९५५ या क्रमांकावर किंवा विशेष गुन्हे शाखेशी ०२२- २७५७६८२० या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)