धुळ्यात विचित्र अपघातात ५ ठार

By Admin | Updated: February 1, 2015 02:12 IST2015-02-01T02:12:08+5:302015-02-01T02:12:08+5:30

कुसुंबाजवळील महामार्गावर ट्रकने अचानक ब्रेक लावल्याने त्यावर काळी-पिवळी व्हॅन आणि त्यावर दुसरा ट्रक आदळून झालेल्या विचित्र अपघातात पाच जण ठार झाले.

5 killed in a strange accident in Dhule | धुळ्यात विचित्र अपघातात ५ ठार

धुळ्यात विचित्र अपघातात ५ ठार

धुळे : कुसुंबाजवळील महामार्गावर ट्रकने अचानक ब्रेक लावल्याने त्यावर काळी-पिवळी व्हॅन आणि त्यावर दुसरा ट्रक आदळून झालेल्या विचित्र अपघातात पाच जण ठार झाले. दुर्घटनेत गंभीर गंभीर जखमी झालेल्या पाच जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघातात दोन्ही ट्रकच्यामध्ये सापडल्याने व्हॅनचा अक्षरश: चुराडा झाला. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक चार तास ठप्प झाली होती़ अपघातग्रस्त व्हॅनमधील एका कांद्याच्या पिशवीत एक लाख १० हजारांची रोकड मिळाली.
नेर (ता़ धुळे) येथून प्रवासी घेऊन काळी पिवळी व्हॅन धुळ्याकडे येत होती. सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास कुसूंबा गावाजवळ दुधाच्या कॅन घेऊन जाणाऱ्या ट्रकने अचानक ब्रेक लावला. त्यामुळे प्रवासी व्हॅन ट्रकवर आदळली़ तर मागून भरधाव येणारा दुसरा ट्रक व्हॅनवर धडकला़ त्यात व्हॅन चालक मनोहर उर्फ महेंद्र पितांबर सोनवणे (३५ रा़ नेर), संतोष चंद्रकांत मोरे (२८ रा़ मोगलाई), प्रकाश बाबुलाल देवरे (३० रा़ वडजाई) व संगीता अर्जुन पुराणीक (२६ रा़ नेर) जागीच ठार झाल़े तर छोटू पुना सोनवणे (३० रा़ लोंढेनाला) यांना रुग्णालयात नेताना मृत्यू झाला. (प्रतिनिधी)

च्अमळनेर : भरधाव मोटारसायकल घसरुन दोन जण जागीच ठार तर एक जण जखमी झाला. शनिवारी सकाळी अमळनेर-धुळे रोडवर मंगरुळ येथील सेंटमेरी शाळेजवळ हा अपघात झाला. नरेंद्र राजेंद्र कोळी (२३, रा. ताडेपुरा) काशीनाथ बापू कुवर (४०) व राहुल बापू कुवर (२३, रा.नवागाव, सुरत) हे विनाक्रमांकाच्या मोटारसायकलने जानव्याकडे जात होते.
च्मोटारसायकलवरील नियंत्रण सुटल्याने ती घसरली त्यात काशिनाथच्या डोक्याला तर राहुलच्या छातीला मार लागल्याने ते जागीच ठार झाले. नरेंद्र कोळी जखमी झाला, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

Web Title: 5 killed in a strange accident in Dhule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.