सिल्व्हासा येथे बोट उलटून मुंबईतील 5 जणांचा मृत्यू
By Admin | Updated: March 29, 2017 06:41 IST2017-03-29T00:40:19+5:302017-03-29T06:41:08+5:30
सिल्व्हासा येथे बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत पाच जणांना जलसमाधी मिळाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

सिल्व्हासा येथे बोट उलटून मुंबईतील 5 जणांचा मृत्यू
ऑनलाइन लोकमत
सिल्व्हासा, दि. 29 - सिल्व्हासा येथे बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत मुंबईतील पाच जणांना जलसमाधी मिळाली. दादरा नगर हवेली येथील मधुबन धरणाच्या बॅकवॉटरमधील दुधनी तलावात मुंबईतील 24 पर्यटक बोटीमधून गेले होते. त्यावेळी बोट उलटून ही दुर्घटना घडली. दरम्यान, बुडालेल्या बोटीमधील अन्य 19 पर्यटकांना वाचवण्यात यश मिळाल्याचे दादरा नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल पटेल यांनी सांगितले.
दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले आणि वाचवण्यात आलेले पर्यटक खन्वाल टाऊन येथील रिसॉर्टवर जात होते. त्यावेळी ही दुर्घटना घडली.