नागपूरच्या ५ डॉक्टरांचा छिंदवाड्याजवळ अपघाती मृत्यू
By Admin | Updated: May 30, 2015 14:29 IST2015-05-30T13:14:22+5:302015-05-30T14:29:27+5:30
नागपूरहून पचमढीकडे जाणा-या डॉक्टरांच्या कारला भीषण अपघात होऊन पाच डॉक्टरांचा मृत्यू झाल्याची घटना मध्य प्रदेशमध्ये घडली.
_ns.jpg)
नागपूरच्या ५ डॉक्टरांचा छिंदवाड्याजवळ अपघाती मृत्यू
>ऑनलाइन लोकमत
छिंदवाडा ( मध्य प्रदेश), दि. ३० - नागपूरहून पचमढीकडे जाणा-या डॉक्टरांच्या कारला भीषण अपघात होऊन पाच डॉक्टरांचा मृत्यू झाल्याची घटना मध्य प्रदेशमध्ये घडली. छिंडवाडाजवळील जुंगवाही येथे हा अपघात घडला.
नागपूरमधील काही डॉक्टर मध्य प्रदेशमधील थंड हवेचे ठिकाण असलेल्या पचमढी येथे जात होते. मात्र जुंगवाहीजवळ त्यांच्या स्विफ्ट कारने रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिली आणि त्यात पाच डॉक्टरांचा मृत्यू झाला.