वसई पालिकेसाठी ४८% मतदान
By Admin | Updated: June 15, 2015 05:21 IST2015-06-15T05:21:52+5:302015-06-15T05:21:52+5:30
वसई-विरार महानगरपालिकेच्या दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या रविवारी झालेल्या मतदानाला पावसाचा जोरदार फटका बसला असून, अवघे ४८.८७

वसई पालिकेसाठी ४८% मतदान
वसई : वसई-विरार महानगरपालिकेच्या दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या रविवारी झालेल्या मतदानाला पावसाचा जोरदार फटका बसला असून, अवघे ४८.८७ टक्के मतदान झाले आहे. सगळ्यांची अपेक्षा किमान ६० ते ६५ टक्के मतदान होईल अशी होती. परंतु, सकाळपासून सुरू झालेल्या पावसाने दुपारपर्यंत संततधार धरल्याने मतदानाचा टक्का घसरला. सकाळी ११पर्यंत मतदारच फारसे न फिरकल्याने अवघे १७.१५ टक्के मतदान झाले. शेवटच्या काळात पाऊस थांबल्याने उमेदवारांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले व मतदारांना केंद्रापर्यंत आणले म्हणून ४८ टक्के तरी मतदान झाले.