शहरं
Join us  
Trending Stories
1
"मोदींची ध्यानधारणा हीदेखील 'मूक पत्रकार परिषद'च होती"; संजय राऊतांचा आयोगावर पलटवार
2
निकालाआधीच कोल्हापूरात विजयाची चर्चा, शाहू महाराजांचे झळकले पोस्टर
3
मोदी तिसऱ्यांदा सत्तेत आले तर काहीतरी भव्य दिव्य होणार; 10 हजार पाहुणे, स्थळ अन् तारीखही ठरली...
4
आरोग्यासाठी फायदेशीर असणारं लिंबू पाणी नेमकं कधी प्यावं?; जाणून घ्या, योग्य वेळ
5
शेअर बाजार 'रेकॉर्ड हाय'वर बंद; 'Modi Stocks'नं एकाच दिवसात केलं मालामाल, अदानींचे शेअर्स रॉकेट
6
लोकसभा निकालाआधीच बॉलिवूडमध्ये मोदींचा डंका! 'या' खानने BJP चं केलं अभिनंदन, म्हणाला...
7
'मोदी 3.0', Exit Poll वर पाकिस्तान, रशिया, चीन, सौदीसह जगभरातील मीडियाने काय म्हटले?
8
लोकसभेच्या निकालाआधीच उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; निवडणूक आयोगाचे कारवाईचे आदेश
9
"भाजपाने सत्तेसाठी इतरांची सरकारं पाडली, कुटुंबांमध्ये भांडणं लावली"; अखिलेश यादवांची टीका
10
धावत्या CNG कारला लागली आग; 4 जणांचा होरपळून मृत्यू, नेमकी कुठे चूक झाली..?
11
दलजीतविरोधात निखिल पटेलची कायदेशीर कारवाई, पत्नीला थेट इशारा देत म्हणाला...
12
सरकार बनताच अॅक्शन मोडमध्ये येणार मोदी! बँकेसह या कंपनीतील हिस्सा विकण्याचा प्लान; शेअर्स बनले रॉकेट
13
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला अंतरवाली सराटीतूनच विरोध, गावकऱ्यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र 
14
हिमाचल प्रदेशमध्ये ३ अपक्ष आमदारांचा राजीनामा मंजूर, आता या मतदारसंघात होणार पोटनिवडणूक
15
निकालाआधीच दिल्लीत हालचालींना वेग! नितीश कुमार यांनी पीएम मोदींची घेतली भेट, अमित शहा यांचीही भेट घेणार
16
शिवसेना तोडली, पण उद्धव ठाकरेंना संपवू शकले नाहीत; महाराष्ट्राचा एक्झिट पोल, भाजपाला सतावणारा
17
सर्वांनी माघार घेतली तर उमेदवार-नोटामध्ये निवडणूक का नाही? आयुक्त राजीव कुमारांनी केले स्पष्ट
18
Lipi Rastogi Suicide Note : मुंबईत आयएएस दाम्पत्याच्या मुलीची आत्महत्या, 'सुसाइड नोट'मध्ये काय? आलं समोर...
19
"आश्वासक बदल दिसला नाहीतर मी..."; CM शिंदेंचा उल्लेख करत शरद पवारांचा सरकारला इशारा
20
"कोणी केले सांगा, आम्ही त्यांना शिक्षा देऊ"; अमित शाह यांनी धमकावल्याच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

सातव्या वेतन आयोगासाठी तिजोरीवर ४६,५३० कोटींचा भार

By अतुल कुलकर्णी | Published: August 10, 2018 5:23 AM

सातव्या वेतन आयोगामुळे राज्याच्या तिजोरीवर ४६,५३० कोटींचा भार पडणार असून त्यातील २१,५३० कोटी रुपये वेतन आयोग प्रत्यक्ष लागू होईल त्या दिवसापासून दरवर्षी द्यावे लागतील.

मुंबई : सातव्या वेतन आयोगामुळे राज्याच्या तिजोरीवर ४६,५३० कोटींचा भार पडणार असून त्यातील २१,५३० कोटी रुपये वेतन आयोग प्रत्यक्ष लागू होईल त्या दिवसापासून दरवर्षी द्यावे लागतील. उर्वरित २५ हजार कोटी आधीच्या वेतन आयोगांप्रमाणे ‘जीपीएफ’मध्ये टप्प्याटप्प्याने द्यावे लागतील.वेतन आयोगाच्या अंमलबजावणसाठी नियुक्त बक्षी समितीचे काम पूर्ण होत आले आहे. अहवालानंतर संबंधित संघटनांच्या नेत्यांशी चर्चा करून निर्णय जाहीर केला जाईल, अशी माहिती वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ‘लोकमत’ला दिली.महाराष्टÑात सातवा वेतन आयोग लागू होणाऱ्या कर्मचाºयांची संख्या १८,१३,४५८ एवढी आहे. सध्या वेतन आणि निवृत्तिवेतनावर सध्या दरमहा ९४०० कोटी रुपये खर्च केले जात आहेत. यातील ४ रुपये वेतनावर तर १ रुपया निवृत्तिवेतनाचे आहेत. मात्र सातव्या वेतन आयोगामुळे अधिकारी, कर्मचाºयांच्या पगारात २३.५५ टक्के वाढ होणार आहे.केंद्र शासनाने सातवा वेतन आयोग १ जानेवारी २०१६ पासून लागू केलाय. आपल्याकडे ज्या तारखेपासून हा आयोग लागू होईल त्या आधीच्या फरकाची रक्कम साधारणपणे २५ हजार कोटींच्या घरात जाते. आधीच्या पाचव्या व सहाव्या वेतन आयोगाची फरकाची रक्कमदेखील दोन ते तीन टप्प्यांत जीपीएफमध्ये जमा केली होती. ही रक्कमदेखील त्याच पद्धतीने कर्मचाºयांच्या जीपीएफमध्ये जमा होईल. ही रक्कम कर्मचाºयांचीच असल्यामुळे ती जीपीएफमध्ये राहिली तर त्यांचा त्यात फायदाच आहे. मात्र ती काढण्यासाठी दोन वर्षांचा लॉकिंग पिरीएड असू शकतो. मात्र या गोष्टी बक्षी समितीचा अहवाल आल्यानंतरच निश्चित होतील. शिवाय एकदम २५ हजार कोटी रुपये एका वर्षात दिले तर राज्यात कोणत्याही योजनाच राबवता येणार नाहीत, ही वस्तुस्थिती अधिकारी, कर्मचाºयांनाही माहिती आहे. त्यामुळे तेदेखील राज्य अडचणीत येईल अशा मागण्या करणार नाहीत, असेही मुनगंटीवार या वेळी म्हणाले.कर्मचारी संपाचा प्रशासनावर फरक पडला नाही; कारण मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कामावर होते, असे सांगून मुनगंटीवार यांनी एकूण १८,१३,४५८ कर्मचाºयांपैकी फक्त १,८५,५४० कर्मचारी संपावर होते, असा दावा केला. कोठे किती कर्मचारी संपावर गेले याची आकडेवारी देताना ते म्हणाले, मंत्रालयात ५४०६ अधिकारी, कर्मचारी काम करतात. त्यापैकी १५ जण रजेवर होते तर ४१८१ हजर होते. फक्त १२१० कर्मचारी संपावर होते.>८ आॅगस्टची संपाची स्थितीविभाग एकूण रजेवर हजर संपावरमंत्रालय ५४०६ १५ ४१८१ १२१०क्षेत्रीय कार्यालये ६९,८९३ ५६७३ ३७,३४० २६,८८०कोकण विभाग ५५,२९० १४११ २९,०५४ २४,८२५नागपूर विभाग ६६,३५३ ११२६ २५,९०३ ३९,३२४पुणे विभाग ७६,७०५ १८७५ ३६,७३२ ४३,९३१औरंगाबाद विभाग १,१३,९७८ १७९२ ६३,८७१ ४८,०४८नाशिक विभाग ७९,८२१ १७५२ ४८,६५६ २९,४१२अमरावती विभाग आकडेवारी आलेली नाही

टॅग्स :MONEYपैसा