व्हीआयपींच्या दिमतीसाठी ४.६५ कोटींच्या गाड्या

By Admin | Updated: March 28, 2017 03:34 IST2017-03-28T03:34:22+5:302017-03-28T03:34:22+5:30

अति-अति महत्त्वाच्या व्यक्ती, राज्य अतिथी व इतर मान्यवर यांच्या दिमतीसाठी ४ कोटी ६४ लाख ९९ हजार

4.65 crores for VIPs' welfare | व्हीआयपींच्या दिमतीसाठी ४.६५ कोटींच्या गाड्या

व्हीआयपींच्या दिमतीसाठी ४.६५ कोटींच्या गाड्या

मुंबई : अति-अति महत्त्वाच्या व्यक्ती, राज्य अतिथी व इतर मान्यवर यांच्या दिमतीसाठी ४ कोटी ६४ लाख ९९ हजार ७३३ रुपये किमतीच्या टोयाटो इनोव्हा क्रिस्टा या २४ नवीन गाड्या खरेदी करण्यात येणार आहेत.
सोलापूरसाठी १, जळगाव ३, औरंगाबाद ४, बीड २, लातूर १, चंद्रपूर ३, नागपूर ५, गोंदिया १ आणि यवतमाळसाठी ४ गाड्या या पैशांतून खरेदी करण्यात येतील. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजशिष्टाचार विभागाला या गाड्या देण्यात येतील. राज्यस्तरीय वाहन धोरण आढावा समितीने जुन्या व निकामी झालेल्या वाहनांऐवजी नवीन गाड्या खरेदी करण्याची शिफारस केली होती. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: 4.65 crores for VIPs' welfare