‘आयआरबी’ला ४५९ कोटी मान्य
By Admin | Updated: December 30, 2015 00:36 IST2015-12-30T00:36:42+5:302015-12-30T00:36:42+5:30
कोल्हापूरच्या टोलसंदर्भात तामसेकर मूल्यांकन समितीच्या अहवालानुसार ‘आयआरबी’ कंपनीने ४५९ कोटी रुपये घेण्याचे मान्य केले असून यासंदर्भात न्यायालयात दाद मागणार

‘आयआरबी’ला ४५९ कोटी मान्य
कोल्हापूर : कोल्हापूरच्या टोलसंदर्भात तामसेकर मूल्यांकन समितीच्या अहवालानुसार ‘आयआरबी’ कंपनीने ४५९ कोटी रुपये घेण्याचे मान्य केले असून यासंदर्भात न्यायालयात दाद मागणार नसल्याची ग्वाही कंपनीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्याची माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी दिली.
कोल्हापूरच्या टोलला हद्दपार केल्यानंतर तयार रस्त्यांच्या दुरुस्ती-देखभालीचा खर्च परवडणारा नसल्याने महानगरपालिकने जिल्ह्याबाहेरील वाहनांना नाममात्र टोल आकारावा, असा आपण प्रस्ताव मांडला होता. पण त्याबाबत आपण आग्रही नाही, असाही खुलासा पाटील यांनी केला. आपण हा प्रस्ताव मागे घेत असल्याचे त्यांनी सांगितले.
पाटील म्हणाले, लोकभावना लक्षात घेऊन विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी या कंपनीचा टोल रद्द करण्याची घोषणा केली. (प्रतिनिधी)
मुंबईबाबत लवकरच निर्णय
मुंबईत प्रवेश करताना आणि राष्ट्रीय महामार्गावरही आयआरबी कंपनीचे टोलनाके आहेत, तेही टोलमुक्त करण्याबाबत राज्य सरकारने अनंत कुलकर्णी यांची समिती नेमली आहे. तिचा अहवाल आल्यानंतरच टोलनाक्यांबाबतही राज्य शासन योग्य तो निर्णय घेईल, असेही पाटील म्हणाले.