४५० कोटींची कात्री !
By Admin | Updated: February 4, 2015 01:01 IST2015-02-04T01:01:48+5:302015-02-04T01:01:48+5:30
महापालिके ची आर्थिक स्थिती बिकट आहे. याही परिस्थितीत स्थायी समितीचे अध्यक्ष बाल्या बोरकर यांनी १६०० कोटींचे बजेट सादर करून सर्वांना आश्चर्यचकित केले होते. परंतु त्यानुसार मनपाच्या

४५० कोटींची कात्री !
मनपा आयुक्तांचा अर्थसंकल्प १५ पर्यंत: विभागप्रमुखांची बैठक
नागपूर : महापालिके ची आर्थिक स्थिती बिकट आहे. याही परिस्थितीत स्थायी समितीचे अध्यक्ष बाल्या बोरकर यांनी १६०० कोटींचे बजेट सादर करून सर्वांना आश्चर्यचकित केले होते. परंतु त्यानुसार मनपाच्या तिजोरीत महसूल गोळा झाला नाही. त्यामुळे आयुक्त अर्थसंकल्पाला ४०० ते ४५० कोटींची कात्री लावण्याची शक्यता आहे.
मनपा कायद्यानुसार आयुक्तांना १५ फेब्रुवारीपर्यत अर्थसंकल्प सादर करणे आवश्यक आहे. ही बाब विचारात घेता आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मंगळवारी विभाग प्रमुखांची बैठक घेतली. त्यांनी अर्थसंकल्पासह मनपाच्या विविध योजनावर चर्चा केली. उत्पन्नाचे स्रोत व खर्चाच्या बाबी जाणून घेतल्या. एलबीटीमुळे उत्पन्नावर परिणाम झाला आहे. अपेक्षित उत्पन्न झाल्याने याचा विकास योजनांना फटका बसला आहे.
मालमत्ता करात मलजल लाभ कर, पाणी लाभ कर व रस्ते कर या तीन नवीन करांचा समावेश करण्याचा प्रस्ताव आहे. तसेच आयुक्त काही नवीन सार्वजनिक हिताच्या योजनांचा समावेश करण्याच्या विचारात आहे. यासाठी आथिक तरतूद करावी लागणार आहे. तत्कालीन आयुक्त श्याम वर्धने यांनी २०१४-१५ या वर्षाचा १०६१.५१ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला होता. या तुलनेत हर्डीकर यांच्या अर्थसंकल्पात १०० कोटींची भर पडण्याची शक्यता आहे. गेल्या काही महिन्यात वसुली मोहीम हाती घेतल्याने
एलबीटी व मालमत्ता करापासून १३५ कोटींचे अधिकचे उत्पन्न होण्याची आशा आहे. एलबीटीपासून ४४० कोटी तर संपत्ती करापासून १९१.३६ कोटीची वसुली होण्याची अपेक्षा आहे. (प्रतिनिधी)
उद्दिष्ट पूर्ण करण्याचे निर्देश
विविध विभागांना वसुलीचे उद्दिष्ट दिलेले आहे. ते त्यांनी ३१ मार्चपर्यत पूर्ण करण्याचे निर्देश हर्डीकर यांनी दिले. त्यानुसार झोनचे सहायक आयुक्त यांना मालमत्ता तसेच एलबीटी विभागाला उद्दिष्ट पूर्ण करावयाचे आहे.