पीक विमा योजनेत ४५ लाख शेतकरी
By Admin | Updated: August 12, 2016 04:37 IST2016-08-12T04:37:39+5:302016-08-12T04:37:39+5:30
नैसर्गिकआपत्ती, हवामान बदलासारख्या संकटातून आर्थिक कवच देणाऱ्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये खरीप हंगामासाठी राज्यातील सुमारे ४५

पीक विमा योजनेत ४५ लाख शेतकरी
मुंबई : नैसर्गिकआपत्ती, हवामान बदलासारख्या संकटातून आर्थिक कवच देणाऱ्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये खरीप हंगामासाठी राज्यातील सुमारे ४५ लाख शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला.लातुरात सर्वाधिक १६ लाख ६५ हजार तर अमरावती विभागात १४ लाख शेतकऱ्यांनी योजनेत सहभाग नोंदविला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेला १० आॅगस्टपर्यंत मुदतवाढ दिली होती. कोकण विभागात ३७ हजार शेतकरी, नाशिक विभागात ६ लाख २२ हजार, पुणे विभाग ३ लाख ७४ हजार, कोल्हापूर विभागात ५१ हजार, औरंगाबाद विभागात ७ लाख ९९ हजार, लातूर विभाग १६ लाख ६५ हजार शेतकरी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी झाले आहेत. (विशेष प्रतिनिधी)