कारमधील ४.५ लाख रोकड जप्त

By Admin | Updated: October 12, 2014 01:12 IST2014-10-12T01:12:44+5:302014-10-12T01:12:44+5:30

अकोला पोलिस व निवडणुक विभाग पथकाची कारवाई.

4.5 lakh cash seized in the car | कारमधील ४.५ लाख रोकड जप्त

कारमधील ४.५ लाख रोकड जप्त

अकोला: पोलिस व निवडणूक विभागाच्या पथकाला शहराकडे येणार्‍या कारमधून ४ लाख ५१ हजार रुपयांची रोकड सापडल्याची घटना शनिवारी रात्री १0 वाजताच्या सुमारास कृषी विद्यापीठासमोरील जकात नाक्याजवळ नाकाबंदीदरम्यान घडली. पोलिसांनी ही रक्कम तात्पुरती ताब्यात घेतली आहे. प्रशांत लिकर एजन्सीचा कर्मचारी विक्रम अशोककुमार करमचंदानी (३0 रा. खदान) हा एमएच ३0 एफ २0३४ क्रमांकाच्या इंडिका कारमधून साडेचार लाख रुपयांची रोख घेऊन अकोल्याकडे येत होता. कृषी विद्यापीठासमोरील जकात नाक्यावर सिव्हिल लाईन पोलिस ठाण्यातील कर्मचारी पोकाँ जाकीर शेख, व्हिडिओ सर्व्हेलन्स टीमचे प्रमुख गजेंद्र शंकरराव पाटील, संदीप कटारे, मच्छिंद्रनाथ ककान यांनी ही कार अडविली. कारची तपासणी केली असता, एका बॅगमध्ये साडेचार लाख रुपयांची रोकड मिळून आली. पथकाने ही रोकड ताब्यात घेऊन कार सिव्हिल लाईन पोलिस ठाण्यात आणली. पोलिसांनी विक्रम करमचंदानी याची कसून चौकशी केली. त्याने ही रोकड कमल आलिमचंदानी यांच्या प्रशांत लिकर एजन्सीची असल्याचे सांगितले आणि एजन्सीचे पावती पुस्तकसुद्धा दाखविले. यावेळी सहायक पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, सिव्हिल लाईनचे ठाणेदार प्रकाश सावकार, एपीआय किशोर शेळके यांनी विक्रमची पुन्हा चौकशी केली. तेव्हा त्याने या रोख रकमेचा हिशोब आपल्याकडे आहे, रकमेबाबतची कागदपत्रे व हिशोब रविवारी दाखवणार असल्याचेही त्याने सांगितले. त्यामुळे पोलिसांनी ही रक्कम तात्पुरती ताब्यात घेतली आहे. रविवारी कागदपत्रांची पाहणी केल्यानंतर ही रोकड संबंधितांच्या ताब्यात देण्यात येईल, अशी माहिती ठाणेदार प्रकाश सावकार यांनी दिली.

Web Title: 4.5 lakh cash seized in the car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.