४५ महाविद्यालयांना मान्यता
By Admin | Updated: September 10, 2014 03:21 IST2014-09-10T03:21:30+5:302014-09-10T03:21:30+5:30
बारावी परीक्षेच्या निकालाचा टक्का वाढत चालल्याने विद्यार्थ्यांना प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश मिळणे अवघड बनले आहे

४५ महाविद्यालयांना मान्यता
मुंबई : बारावी परीक्षेच्या निकालाचा टक्का वाढत चालल्याने विद्यार्थ्यांना प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश मिळणे अवघड बनले आहे. कोणताही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये, यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने राज्यातील ४६ नवीन महाविद्यालयांना मान्यता दिली आहे. यामुळे विविध अभ्यासक्रमांच्या हजारो जागा वाढणार असून, ती पुढील शैक्षणिक वर्षापासून सुरू होणार आहेत.
यंदा बारावी परीक्षेचा निकाल विक्रमी लागल्याने प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना बरीच कसरत करावी लागली. यामुळे महाविद्यालयांना आवश्यकतेनुसार जागा वाढवून देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. गेल्या काही वर्षांपासून उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे मान्यतेसाठी आलेल्या महाविद्यालयांच्या प्रस्तावांना अखेर मान्यता मिळाली आहे. त्यानुसार राज्यात ४५ नवीन महाविद्यालये सुरू होणार आहेत. विनाअनुदानित तत्त्वावर पुढील शैक्षणिक वर्षापासून ही महाविद्याालये सुरू होणार आहेत.
विद्यापीठाकडून आलेल्या प्रस्तावाची छाननी प्रक्रिया पूर्ण करीत उच्च व तंत्रशिक्षण विभागाने या ४५ नव्या महाविद्यालयांना मान्यता दिली आहे आणि ती २0१५-१६ शैक्षणिक वर्षांपासून सुरू होणार आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा मार्ग सुकर बनणार आहे. (प्रतिनिधी)