‘आरटीई’ अंतर्गत 44,634 प्रवेश
By Admin | Updated: December 10, 2014 01:29 IST2014-12-10T01:29:23+5:302014-12-10T01:29:23+5:30
राज्यातील दुर्बल घटकातील विद्याथ्र्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘आरटीई’अंतर्गत (राईट टू एज्युकेशन) राज्यात 44 हजार 634 विद्याथ्र्याना प्रवेश देण्यात आले आहेत.
‘आरटीई’ अंतर्गत 44,634 प्रवेश
नागपूर : राज्यातील दुर्बल घटकातील विद्याथ्र्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘आरटीई’अंतर्गत (राईट टू एज्युकेशन) राज्यात 44 हजार 634 विद्याथ्र्याना प्रवेश देण्यात आले आहेत. शाळांमध्ये ‘आरटीई’च्या अंमलबजावणीसंदर्भात प्रकाश गजभिये, हेमंत टकले, अॅड.निरंजन डावखरे यांनी विचारणा केली होती. यावर लेखी उत्तरात शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी ही माहिती दिली.
‘आरटीई’च्या तरतुदींनुसार वंचित व दुर्बल घटकातील मुलांना खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये 25 टक्के प्रवेश राखीव आहेत. राज्यात नियमानुसार प्रवेशप्रक्रिया पार पडली आहे. 2क्14-15 या शैक्षणिक वर्षासाठी राज्यात 44 हजार 634 पात्र विद्याथ्र्याना प्रवेश देण्यात आले असे उत्तरात स्पष्ट करण्यात आले.
कायमस्वरूपी 43 ‘मॉडेल स्कूल’ उभारणार
4राज्यात शैक्षणिकदृष्टय़ा मागासलेल्या आदिवासी दुर्गम भागातील मुलामुलींसाठी कायमस्वरूपी 43 ‘मॉडेल स्कूल’ उभारण्याची कार्यवाही सुरू आहे. 23 मे 2क्12 रोजीच्या शासननिर्णयानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात नरेंद्र पाटील, किरण पावसकर, सुनील तटकरे यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. यावर लेखी उत्तरात शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी ही माहिती दिली. सर्व गटांमध्ये जिल्हा परिषद शाळांतील उपलब्ध जागांमध्ये ‘मॉडेल स्कूल’ सुरू करण्यात आले आहेत.तसेच राज्यातील 43 गटांमध्ये कायमस्वरूपी ‘मॉडेल स्कूल’ व विद्यार्थिनींसाठी वसतीगृहाचे बांधकाम करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत कार्यवाही सुरू आहे असे उत्तरात स्पष्ट करण्यात आले आहे.
नर्सरी शिक्षणासाठी धोरण निश्चिती करणार
4राज्यातील इंग्रजी माध्यमाच्या नर्सरी शाळा तसेच बालवाडय़ांसाठी धोरण निश्चिती करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे. यासंदर्भात डॉ.अपूर्व हिरे यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. यावर लेखी उत्तरात शालेय शिक्षण मंत्र्यांनी ही माहिती दिली. नर्सरी शाळांमध्ये प्रवेशाचे विनिमय व शुल्क, शिक्षकांची शैक्षणिक अर्हता, सेवाशर्ती तसेच इतर बाबींच्या नियंत्रणासाठी गठित समितीकडून शासनाला शिफारशी करण्यात आल्या होत्या. राज्यातील पूर्व प्राथमिक शिक्षणाबाबत धोरण निश्चिती व कायदा तयार करण्याची बाब विचाराधीन असून त्यावर शासनस्तरावर कार्यवाही सुरू आहे अशी माहिती मंत्र्यांनी उत्तरात दिली. (प्रतिनिधी)
1क्4 क्रीडा संकुलांसाठी जागेचे प्रयत्न सुरू
नागपूर : राज्यातील 1क्4 क्रीडा संकुलांसाठी जागा मिळविण्याचे प्रय} सुरू आहेत, अशी माहिती क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी लेखी उत्तरात दिली. सतीश चव्हाण, अमरसिंह पंडित व धनंजय मुंडे यांनी विधान परिषेदत याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. 38क् तालुका क्रीडा संकुले उभारण्याचे काम 2क्क्3 पासून सुरू आहे. यापैकी 65 क्रीडा संकुलांना मार्च 2क्14 अखेर निधी वितरित झाला आहे, तर 17 संकुलांच्या अंदाजपत्रक आराखडय़ांना राज्य क्रीडा विकास समितीची मान्यता मिळाली आहे. 33 संकुलांचे अंदाजपत्रक आराखडे संबंधित जिल्हा क्रीडा अधिका:यांकडून तयार करण्याची कार्यवाही सुरू आहे, असे उत्तरात नमूद करण्यात आले आहे.