राज्यभरातील 44 टोलनाके आजपासून बंद

By Admin | Updated: July 1, 2014 01:53 IST2014-07-01T01:53:12+5:302014-07-01T01:53:12+5:30

महाराष्ट्रातील 44 टोलनाके बंद करण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिला़ त्यामुळे आज, 1 जुलैपासून हे टोलनाके बंद होतील़

44 tollnables closed in the state today | राज्यभरातील 44 टोलनाके आजपासून बंद

राज्यभरातील 44 टोलनाके आजपासून बंद

>मुंबई :  महाराष्ट्रातील 44 टोलनाके बंद करण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिला़ त्यामुळे आज, 1 जुलैपासून हे टोलनाके बंद होतील़
राज्यात एकूण 166 टोलनाके आहेत़ त्यातील 73 सार्वजनिक बांधकाम विभागाचे आहेत; तर 53 एमएसआरडीसीचे असून, 4क् राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे आहेत़ यांपैकी 34 सार्वजनिक बांधकाम विभागाचे व 1क् एमएसआरडीसीचे टोलनाके बंद होतील़
न्या़ नरेश पाटील यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली़ त्यात मुख्य सरकारी वकील संदीप शिंदे यांनी हा सरकारचा धोरणात्मक निर्णय असल्याकडे न्यायालयाचे लक्ष वेधल़े ते म्हणाले, कर आकारणो व रद्द करणो असे दोन्ही अधिकार सरकारला आहेत़ त्याअंतर्गतच काही टोलनाके बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आह़े
अॅड़ शिंदे यांचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने सरकारच्या या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिला व ही सुनावणी दोन आठवडय़ांसाठी तहकूब केली़
टोल बंदच्या सरकारच्या निर्णयाला काही कंत्रटदारांनी याचिका दाखल करून आव्हान दिले आह़े  त्यानुसार, टोलनाके बंद होणा:या कंत्रटदारांना एकूण 3क्6 कोटी रुपये नुकसानभरपाई शासनाने जाहीर केली आह़े प्रत्यक्षात कंत्रटदारांची 3 हजार कोटी रुपयांची थकबाकी आह़े तसेच कमी किमतीचे टोलनाके बंद करणार असल्याचे शासनाचे म्हणणो आह़े 
मात्र हे चुकीचे आह़े कंत्रटदारांनी रस्ते विकासासाठी कोटय़वधी रुपये खर्च केले आहेत़ या प्रकल्पामुळे अनेकांना रोजगार मिळाला आह़े अचानक टोलनाके बंद झाल्यास संबंधित कामगार व अधिका:यांच्या रोजगारावर गदा येईल़ तेव्हा टोलनाके बंद करण्याचा निर्णय रद्द करावा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आह़े (प्रतिनिधी)
 
महागाईमुळे होरपळलेल्या जनतेस रेल्वे भाववाढीमुळे आणखीनच फटका बसला असून, त्यातून थोडा दिलासा देण्यासाठी मंगळवारपासून (1 जुलै) राज्यातील 44 टोलनाके बंद करण्याच्या कार्यवाहीस प्रारंभ होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. राज्यातील सर्वच टोलनाक्यांवर राज्य परिवहन महामंडळाच्या एस.टी. बसला सरसकट टोलमाफी करण्याचीही कार्यवाही सुरू झाली असल्याचे त्यांनी सांगितले.  

Web Title: 44 tollnables closed in the state today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.