शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्राला पाकिस्तानने या तीन टास्क दिलेल्या; भारताविरोधात असे विणले जात होते जाळे...
2
बिटींग रिट्रीट सेरेमनी आजपासून सुरु होणार; पण भारत ना हस्तांदोलन करणार, ना गेट उघडणार...
3
छगन भुजबळ मंत्रिमंडळात परतताच मनोज जरांगे संतापले; अजित पवारांना दिला सूचक इशारा
4
गुगल क्रोममध्ये आढळल्या गंभीर त्रुटी! तुमचा कॉम्प्युटर कधीही होऊ शकतो हॅक; सरकारकडून अलर्ट
5
मुंबईत कोरोनाचे ५३ रुग्ण, महापालिका सतर्क; आपत्कालीन परिस्थितीसाठी रुग्णालये सज्ज 
6
भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये TRF विरुद्ध पुरावे दिले; पहलगाम दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी घेतली होती
7
Mumbai Weather : वीजा कडाडणार, वादळीवारे सुटणार! हवामान खात्याकडून मुंबईला २१ जूनपर्यंत यलो अलर्ट
8
शपथ घेताच छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “गृहमंत्रालयही सांभाळले आहे, आता...”
9
अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 
10
स्टेडियममधून पाकिस्तानी खेळाडूंची नावं, फोटो काढून टाकले; 'या' शहरात घेतला गेला निर्णय
11
बाबो! ३ मुलांची आई सासऱ्यासोबत झाली फरार; पतीने जाहीर केलं २० हजारांचं बक्षीस
12
“एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री, जनता अशीच भरडली जाणार, असा काय नाईलाज आहे”
13
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
14
Corona Virus : कोरोना रिटर्न्स! JN.1 व्हेरिएंटचा कहर; 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध, 'या' लोकांना सर्वाधिक धोका
15
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमावरून अक्षय कुमार आणि विकी कौशलमध्ये भांडणं?
16
ट्रम्प यांचा सल्ला कुक यांनी धुडकावला! अ‍ॅपलचा भारतावरच विश्वास; इतक्या कोटींची केली गुंतवणूक
17
शेख हसीना यांच्याविरूद्ध बांगलादेश सरकारची नवी खेळी! आधी पक्षावर बंदी, त्यातच आता...
18
कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय! महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर, देशांत सर्वाधिक रुग्णसंख्या कुठे?
19
संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा
20
लग्नानंतर ६ महिन्यांतील फक्त २१ दिवस एकत्र होते विरुष्का, अनुष्काचा खुलासा, म्हणाली...

४३ पोलिसांचा सन्मान

By admin | Updated: August 15, 2016 04:56 IST

पोलीस दलातील शौर्यपूर्ण व गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राज्यातील ४१ अधिकारी/ कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदकाने गौरविण्यात आले

मुंबई : पोलीस दलातील शौर्यपूर्ण व गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राज्यातील ४१ अधिकारी/ कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदकाने गौरविण्यात आले आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृहमंत्रालयाकडून हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. अप्पर महासंचालक व विक्रीकर विभाागाचे मुख्य दक्षता अधिकारी के.के.सांरगल, वांदे्र विभागाचे सहाय्यक आयुक्त संजय कदम, औरंगाबादेतील एमआयडीसी पोलीस निरीक्षक निरीक्षक रामेश्वर थोरात यांना गुणवतापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदकाने गौरविण्यात आले. सशस्त्र दलातील (एल ए -२) उपाआयुक्त श्रीप्रकाश वाघमारे, ठाणे शहर परिमंडळ-२ चे उपायुक्त संजय शिंदे यांच्यासह ३८ जणांचा राष्ट्रपती पोलीस दलाने सन्मानित करण्यात आला आहे.राष्ट्रपती पदक जाहीर झालेल्या अन्य अधिकार/कर्मचाऱ्यांची नावे (कंसात ठिकाण) : , राजेंद्र दाभाडे (नाशिक शहर, परिमंडळ-२), समादेशक रविंद्रसिंग परदेशी (राज्य राखीव दल-९, नवी मुंबई), अप्पर अधीक्षक भगवान याधोड (अप्पर अधीक्षक,पालघर), उपायुक्त बाळकृष्ण यादव ( वायरलेस, मुंबई), सहाय्यक आयुक्त सर्वश्री श्रीधर खंडारे (राज्य राखीव दल, -४ नागपूर), नितीन कौसाडीकर ( नियंत्रण कक्ष, नवी मुंबई), वरिष्ट निरीक्षक सुनील बाजरे (पनवेल),फिरोज पटेल ( मुंबई शहर), उपनिरीक्षक सर्वश्री नारायण वारे (पालघर), अरविंद देवरे (चाळीसगाव, जळगाव), विद्याधर घोरपडे (सीएसटी रेल्वे स्टेशन), दादा अवघडे (गुन्हे शाखा, नवी मुंबई), सहाय्यक फौजदार सर्वश्री आबासाहेब सुंबे (वायरलेस, पुणे), उत्तम जाधव (नियंत्रण कक्ष, लातूर), दामोदर मोहिते (मोटार परिवहन विभाग, परिवहन), प्रकाश तरोडकर (किनवाट, नांदेड), शांताराम वानखेडे (वाचक शाखा, जळगाव), अनील दांगट (अप्पर अधीक्षक कार्यालय, गडचिरोली), संभाजी देशमुख (विशेष शाखा, ठाणे), हवालदार सर्वश्री प्रकाश कोकाटे (चालक, मुख्यालय, कोल्हापूर), रविंद्र मयेकर (वाहतुक शाखा, दिंडोशी), हरीदयत साळवी (एम.टी., नाशिक), गंगाधर चौधरी (मुख्यालय, अकोला), संजय शिंदे (तपास अधिकारी, राज्य गुप्त वार्ता विभाग), शरदचंद्र तिवारी (मुख्यालय, अमरावती शहर), संदीपकुमार रायकर (कळवा, ठाणे), संजय हुंडेकरी (सोलापूर शहर), राजू बनसोड (वाचक, तपास पथक, गुन्हे शाखा ,मुंबई), प्रल्हाद मदने (एमआरए मार्ग, मुंबई), प्रदीप बडगुजर (बीडीडीएस, जळगाव), रमेश शिंदे (वाहतुक शाखा, मुंबई), नामदेव रेणुसे ( विशेष शाखा, पुणे शहर), संगिता सावरकर (गुन्हा अन्वेषण शाखा, पुणे), गुरुनाथ माळी (दहशतवादी विरोधी पथक, मुंबई) व गुरुनाथ कुलकर्णी (एएनटीआय भष्ट्राचार कक्ष, नाशिक) (प्रतिनिधी)>हवालदार अरुण जाधव पुन्हा सन्मानितस्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती पोलीस पदकाने गौरविण्यात आलेल्या पोलिसांमध्ये मुंबईत पोलीस दलातील हवालदार अरुण जाधव यांचाही समावेश आहे. २६/११ च्या हल्ल्यावेळी कामा रुग्णालयाच्या बाहेर अतिरेकी अजमल कसाब व त्याच्या सहकाऱ्याने केलेल्या गोळीबारात जाधव गंभीर जखमी झाले होते. यावेळी तत्कालिन एटीएस प्रमुख हेमंत नागराळे, अप्पर आयुक्त अशोक कामटे व निरीक्षक अरुण साळसकर शहीद झाले होते. जाधव दीर्घ उपचारानंतर पुन्हा खात्यात कार्यरत असून सध्या गुन्हा अन्वेषण शाखेत कार्यरत आहेत. २६/११ तील कामगिरीबाबत त्यांना २००९ मध्ये राष्ट्रपती पदकाने गौरविण्यात आले आहे. यावर्षी त्यांना पुन्हा हा सन्मान मिळाला असून त्यांच्यासह मुंबईत २ वर अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.