लातूरमधील शेंद्री- सुनेगावात मतदानावर बहिष्कार, जिल्ह्यात दुपारपर्यंत 42 टक्के मतदान
By Admin | Updated: February 16, 2017 17:02 IST2017-02-16T17:02:06+5:302017-02-16T17:02:06+5:30
लातूर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी गुरुवारी सकाळी ७.३० ते दुपारी १.३० वाजेपर्यंत जिल्ह्यात ३७.४७ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर दुपारी मतदानात पुन्हा वाढ होऊन ४२ टक्क्यांपर्यंत

लातूरमधील शेंद्री- सुनेगावात मतदानावर बहिष्कार, जिल्ह्यात दुपारपर्यंत 42 टक्के मतदान
लातूर : लातूर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी गुरुवारी सकाळी ७.३० ते दुपारी १.३० वाजेपर्यंत जिल्ह्यात ३७.४७ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर दुपारी मतदानात पुन्हा वाढ होऊन ४२ टक्क्यांपर्यंत मतदान केले. ५.३० वाजेपर्यंत सरासरी ६५ टक्के मतदान होईल, असा अंदाज आहे. दरम्यान, अहमदपूर तालुक्यातील शेंद्री- सुनेगावात मतदारांनी मतदानावर बहिष्कार घातला असून, त्यांची रस्त्याची मागणी आहे.
जिल्हा परिषदेच्या ५८ आणि पंचायत समितीच्या ११६ जागांसाठी हे मतदान होत असून, लातूर तालुक्यात ३४.४४, रेणापूर तालुक्यात ४१.०३, औसा तालुक्यात ३८.९९, उदगीर तालुक्यात ४३.१२, अहमदपूर तालुक्यात ३७.०८, चाकूर तालुक्यात ३८.३४, जळकोट तालुक्यात ३४.३०, निलंगा तालुक्यात ४०.५०, देवणी तालुक्यात ३८.२८, शिरूर अनंतपाळ तालुक्यात ३९.९० टक्के असे मतदान दुपारी १.३० वाजेपर्यंत झाले होते. त्यानंतर मतदानात वाढ होत दुपारी ४.१५ वाजेपर्यंत ४२ टक्के मतदान झाले होते.
शेंद्री-सुनेगावात मतदानावर बहिष्कार...
अहमदपूर तालुक्यातील शेंद्री-सुनेगावला रस्ता नसल्याने गावकऱ्यांनी दुपारी ३.४० वाजेपर्यंत मतदानावर बहिष्कार टाकला होता. त्यामुळे उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी, तहसीलदार प्रवीण मेंगशेट्टी, उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक, पोलीस निरीक्षक सालार चाऊस यांनी गावास भेट देऊन गावकऱ्यांची समजूत घातली. मात्र गावकरी आपल्याच भूमिकेवर ठाम आहेत.