भिगवण : चिलापी माशाशिवाय इतर जातीच्या माशांचे प्रमाण कमालीचे घटले असताना उजनी जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात मासेमारीसाठी गेलेल्या तीन मच्छिमारांना तब्बल ४२ किलो वजनाचा कटला मासा सापडला. या जलाशया अलिकडच्या काळात सापडलेला हा सर्वात मोठा कटला मासा आहे. हा मासा बारामतीचे मासे व्यापारी शंकर मोरे यांनी १३० रुपये प्रतिकिलो दराने खरेदी केला आहे. जवळपास साडेपाच हजार रुपयांमध्ये हा एक मासा खरेदी झाला. भिगवण मासळी बाजारातील आडतदार भगवान महाडिक यांच्या आडतीवर आलेला हा मासा नितिन काळे व सुदाम चव्हाण यांच्या जाळ्यात सापडला.भला मोठा मासा पाहण्यासाठी मासे बाजारात बघ्यांनी एकच गर्दी केली होती. उजनीत पूर्वी ५० किलोपासून शंभर किलो वजनाचे कटला जातींचे मासे सापडत मात्र, अलिकडे सर्वच जातींच्या माशांचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे अलिकडच्या वीस वर्षातील सर्वांत जास्त वजनाचा आजचा मासा ठरला आहे.
उजनीमध्ये सापडला तब्बल ४२ किलोचा मासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2018 19:00 IST
उजनी जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात मासेमारीसाठी गेलेल्या तीन मच्छिमारांना तब्बल ४२ किलो वजनाचा कटला मासा सापडला आहे.
उजनीमध्ये सापडला तब्बल ४२ किलोचा मासा
ठळक मुद्दे जवळपास साडेपाच हजार रुपयांमध्ये हा एक मासा खरेदी