वाशिममध्ये ४१ वर्षापासून ‘रिगल’च्या जिलेबीला खवय्यांची पसंती
By Admin | Updated: July 7, 2016 15:22 IST2016-07-07T14:49:27+5:302016-07-07T15:22:43+5:30
विविध मांगलीक कार्यक्रम असो अथवा सणवार, आनंदाचा क्षणाच्यावेळी गत ४१ वर्षांपासून ‘रिगल’ कॅफेतील ‘रिगल’ जिलेबिच्या खवय्यांची पसंती कायम आहे.

वाशिममध्ये ४१ वर्षापासून ‘रिगल’च्या जिलेबीला खवय्यांची पसंती
>ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. ७ - विविध मांगलीक कार्यक्रम असो अथवा सणवार, आनंदाचा क्षणाच्यावेळी गत ४१ वर्षांपासून वाशिमच्या ‘रिगल’ कॅफेतील ‘रिगल’ जिलेबिच्या खवय्यांची पसंती कायम आहे.
वाशिम येथील गुरुवार बाजार परिसरात टिळक स्मारक भवन लगत असलेल्या रिगल कॅफे या उपहार गृहाच्या जिलेबीने वाशिम जिल्हयातच नव्हे तर मराठवाडयातील हिंगोली जिल्हयातील खवय्यांना सुध्दा आकर्षित केले आहे. सुमारे ४१ वर्षापूर्वी आणिबाणी काळात शहरातील दत्तात्रय इथापे यांनी लोकांसाठी रिगल कॅफे नावाने उपहार गृहाची सुरुवात केली होती. येथे इतर खाद्य पदार्थासह जिलेबी काढण्यात येते. येथील जिलेबी पाहिजे त्या आकारात, साईजमध्ये उपलब्ध होत असल्यामुळे प्रसिध्द आहे. जिलेबी बनविण्याची पध्दत, आकार व चवीमुळे ती सर्वत्र प्रसिध्द झाली व आजही आहे. या जिलेबिचा आस्वाद घेण्यासाठी आजही परिसरातील खवय्ये आवर्जून येतात. दत्तात्रय इथापे यांच्या नंतर त्यांचे चिरजिव राजु इथापे हे वडिलांची परंपरा अद्याप कायम ठेवून आपल्या उपहारगृहातील जिलेबीची चव कायम ठेवत आहेत.