शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

विधानसभेच्या ४००, लोकसभेच्या १०० जागा कराव्या लागणार; वडेट्टीवारांचा शिंदे-फडणवीस-पवारांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2023 17:06 IST

काँग्रेस फुटणार हे बिनबुडाचं आहे. त्यात काही ही तथ्य नाही. अफवा आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.

वंचितला सोबत घेण्यावरून महाविकास आघाडीत मतमतांतरे होती. उद्धव ठाकरेंनी प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत युती केल्याने मविआच्या नेत्यांमध्ये नाराजी होती. परंतू, अजित पवार शिंदे-भाजपसोबत गेल्याने मविआला आता वंचित सारख्या समविचारी पक्षांशी मोट बांधणे गरजेचे वाटू लागले आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी हे वक्तव्य केले आहे. 

काँग्रेस फुटणार हे बिनबुडाचं आहे. त्यात काही ही तथ्य नाही. अफवा आहे, असे वडेट्टीवार म्हणाले. याचबरोबर पंकजा मुंडे मोठ्या नेत्या आहेत, त्यांचे आम्ही काँग्रेसमध्ये स्वागत करु. त्या आल्यावर आम्हाला फायदा होईल.  त्या लोकप्रिय नेत्या आहेत. त्यांना समाजाचा पाठिंबा आहे. मराठवाड्यात स्वागत करू, असे ते म्हणाले. 

वंचित सारख्या समविचारी पक्षाशी मोट बांधणं अनिवार्य आहे. प्रकाश आंबेडकरांसोबत जायला आम्ही तयार आहोत, असे वक्तव्य वडेट्टीवार यांनी केले आहे. 

आगामी मनपा निवडणुकीसाठी काँग्रेस तयार आहे. जनतेचा विश्वास आमच्यावर आहे. जे कमजोर आहे ते तयारी करतात. मजबूत आहे ते वेळेवर उतरतात, असे ते म्हणाले. इनकमिंगवर तुम्हाला फार वाट बघावी लागणार नाही. सामान्यांच्या प्रतिक्रिया राजकारण्यांचे तोंडात शेण घालणाऱ्या आहेत. आज आम्हाला आमदार म्हणायला लाज वाटतेय. या स्थितीत काँग्रेसवर जनतेचा विश्वास वाढतोय. बरीच मंडळी काँग्रेसमध्ये येणार आहेत, असे ते म्हणाले. 

ज्याची संख्या जास्त त्याचा विरोधीपक्ष नेता. मी यापूर्वी विरोधीपक्ष नेता राहिलोय. पुन्हा जबाबदारी मिळाली तर आनंद होईल. याबाबत हायकमांड निर्णय घेणार. न घाबरणारा, न झोपणारा दबावात न येणारा नेता पाहून हायकमांड निर्णय घेणार आहे. शिंदे फडणवीस पवार सरकारमध्ये वाद होण्याची सुरुवात झाली. आता विधानसभेच्या ४०० जागा कराव्या लागणार आहेत. लोकसभेच्या १०० करुन टाका. हे सर्व हास्यास्पद सुरु आहे, असा टोला वडेट्टीवार यांनी लगावला आहे.  

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारAjit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदेPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर