कापसासाठी ४०० कोटींची हमी
By Admin | Updated: January 6, 2016 01:57 IST2016-01-06T01:57:26+5:302016-01-06T01:57:26+5:30
यंदा राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाने सर्वांत कमी कापूस खरेदी केलेली असतानाही राज्य शासनाने आज कापूस खरेदीसाठी महासंघाला ४०० कोटी रुपयांची हमी दिली.

कापसासाठी ४०० कोटींची हमी
मुंबई : यंदा राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाने सर्वांत कमी कापूस खरेदी केलेली असतानाही राज्य शासनाने आज कापूस खरेदीसाठी महासंघाला ४०० कोटी रुपयांची हमी दिली.
महासंघाला कापसाची देणी वेळीच देता यावीत म्हणून बँक आॅफ इंडिया आणि आंध्र बँकेकडून अनुक्रमे ३०० कोटी आणि १०० कोटी रुपयांचे कर्ज घेण्याकरता एक वर्षासाठी हमी देण्यात आली आहे. शासनाने महसासंघाला कापूस खरेदीसाठी आधीच ५० कोटी रुपये दिले. महासंघाने या बँकांकडून घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीमध्ये कसूर केल्यास महासंघाच्या चल/अचल संपत्तीचा लिलाव करून कर्जवसुलीची प्रक्रिया बँकांनी पूर्ण करावी. या बँकांना राज्य शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय मर्यादेपेक्षा अधिकचे कर्ज देता येणार नाही, अशा अटी शासनाने ४०० कोटी रुपयांची हमी देताना घातल्या आहेत. केंद्राने कापसाची किंमत ४ हजार १५० रुपये प्रति क्विंटल केली आहे. सध्या खासगी व्यापारी क्विंटलमागे ४६०० ते ५००० रुपये इतका भाव देत आहेत. (विशेष प्रतिनिधी)