400 लगAातून बॅण्डबाजा, घोडा हद्दपार!
By Admin | Updated: July 13, 2014 01:11 IST2014-07-13T01:11:32+5:302014-07-13T01:11:32+5:30
लग्नामधून बॅण्डबाजा, फटाके व घोडा हद्दपार करण्याचा अनुसरणीय निर्णय घेत, विदर्भ व खान्देशातील बारी समाजाने उभ्या महाराष्ट्रापुढे एक चांगला आदर्श ठेवला आहे.

400 लगAातून बॅण्डबाजा, घोडा हद्दपार!
जयदेव वानखडे - जळगाव जामोद (जि़ बुलडाणा)
लग्नामधून बॅण्डबाजा, फटाके व घोडा हद्दपार करण्याचा अनुसरणीय निर्णय घेत, विदर्भ व खान्देशातील बारी समाजाने उभ्या महाराष्ट्रापुढे एक चांगला आदर्श ठेवला आहे. गेल्या लग्नसराईच्या हंगामात विदर्भ व खान्देशात, बारी समाजातील 3क्क् विवाह सोहळे या निर्णयाला अनुसरून पार पडले. बारी समाजाचा आदर्श समोर ठेवून इतर काही समाजातही सुमारे 1क्क् विवाह याच पद्धतीने पार पडले. या क्रांतीकारी निर्णयामुळे अनेक कुटुंबांची लाखो रुपयांची बचत झाली आणि सोबतच परंपरागत अनिष्ट चालिरितींनाही फाटा देण्यात आला़
इतर काही समाजांनीही त्याचे अनुकरण करण्याचा प्रयत्न केला. सत्यशोधक ओबीसी परिषदेने माळी समाजातही हा निर्णय राबविण्याचा प्रयत्न केला. कुणबी, पाटील या मोठय़ा समाजांसह काही लहान समाजांनीही या निर्णयाचे स्वागत केल़े विदर्भातील जळगाव जामोद, संग्रामपूर, अकोट, अंजनगाव, अमरावती, यवतमाळ या भागांमधील बारी समाजबांधवांनी हा विचार स्वीकारला.
खान्देशमध्ये वडोदा, कु:हा, शेंदुर्णीसह संपूर्ण जळगाव जिलत, बारी समाजाने बॅण्डबाजा, घोडा आणि फटाके हद्दपार करुन लग्ने लावली. बारी समाजात 3क्क् पेक्षा जास्त लग्न या तत्वानुसार झाली, तर इतर काही समाजांमध्येही सुमारे 1क्क् लग्ने बॅण्डबाजा, घोडा आणि फटाक्यांना फाटा देत लागली. या निर्णयाचा अंगिकार करणा:या प्रत्येक वरपित्याची किमान 3क् ते 4क् हजार रुपयांची बचत झाली. त्याचबरोबर लग्न वेळेवर लागली, मद्य प्राशन करुन गोंधळ घालणारे तरुण दिसले नाहीत आणि लग्नात मानपानासाठीही वाद झाले नाहीत, तसेच रुसवे-फुगवे दिसले नाहीत. त्याशिवाय ध्वनी प्रदूषणाला आळा बसला तो वेगळाच!
22 नवरदेवांचा सत्कार
च्या निर्णयाचा अंगीकार करुन बारी समाजातील यंदाच्या हंगामात लग्न झालेल्या 22 नवरदेवांचा, बारी समाजाच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
च्ही परंपरा भविष्यातही अशीच सुरू ठेवून, इतर समाजांपुढे आदर्श निर्माण करण्याचे आवाहन करण्यात आले.
च्2क्क्2 मध्ये माझा विवाह बॅण्डबाजा, घोडा आणि फटाक्यांना फाटा देत, अगदी साध्या पध्दतीने पार पाडला. त्यानंतर समाजाने हा निर्णय घेतला व त्यावर्षी माङो लहान बंधू विलास व चुलत बंधू प्रकाश दिलीप डोबे या दोघांची लग्नेही आदर्श पध्दतीने पार पडली.
च्हा निर्णय समाजहिताचा असून, तो सर्वानी अंगीकारला पाहिजे. असे बारी समाज कार्यकर्ता व जळगाव जामोदचे नगरसेवक कैलास डोबे यांनी दिली.