४0 वर्षांचे नागरिकही घेतात प्रवास सवलत
By Admin | Updated: August 12, 2014 01:07 IST2014-08-12T01:07:22+5:302014-08-12T01:07:22+5:30
ज्येष्ठ नागरिकांसाठी अर्धी तिकीट ही योजना सुरू केली असली तरी या योजनेचा ग्रामीण भागात गैरवापर होत असल्याने एसटी तोट्यात कारण

४0 वर्षांचे नागरिकही घेतात प्रवास सवलत
दगडपारवा - शासनाने ज्येष्ठ नागरिकांसाठी अर्धी तिकीट ही योजना सुरू केली असली तरी या योजनेचा ग्रामीण भागात गैरवापर होत असल्याने एसटी तोट्यात जाण्याच्या कारणामध्ये एकने भर पडली आहे. एसटीचा फायदा मिळावा म्हणून ६५ वर्ष पूर्ण पाहिजे परंतु ग्रामीण भागात ४0 ते ४५ वर्षीय व्यक्तींनी एसटीच्या पासेस बनविल्या आहेत. यामुळे वाहक काहीच करू शकत नाहीत. निवडणूकीचे पत्र, राशन कार्ड किंवा आधार कार्ड यापैकी एक दस्ताऐवज प्रवासाच्यावेळी सोबत असणे गरजेचे आहे. एसटीमध्ये बनावट कार्ड आढळल्यास प्रवासी वाद घालतात. यामुळे वाहक इच्छा असूनही काहीच करू शकत नाहीत. १00 रू पयामध्ये बनावट ओळखपत्रांची विक्री होत आहे. एसटीच्या तपासणी पथकाने आतापर्यत असे बोगस कार्डधारक का पकडले नाहीत हा संशोधनाचा विषय बनला आहे. बनावट पासेसच्या आधारे प्रवास करणार्यांची संख्या अधिक असल्यामुळे वाहकाकडे उत्पन्न मिळत नाही. अकोला १ व २ आगार, मंगरू ळपीर, वाशिम, रिसोड, कारंजा, तेल्हारा, मूर्तीजापूर,आकोट आगारातून असे प्रवासी प्रवास करीत असल्याची माहिती आहे. अकोला ते दिग्रस मंगरू ळपीर मार्गावर मोठय़ा प्रमाणात पासधारक बनावट असल्याची माहिती आहे. या प्रकाराची एसटीच्या अधिकार्यांनी चौकशी करावी, पासेस तपासण्यासाठी पथक नेमावे अशी मागणी होत आहे.