आगीत ४० गाई होरपळल्या
By Admin | Updated: June 7, 2016 20:43 IST2016-06-07T20:43:44+5:302016-06-07T20:43:44+5:30
शेतातील गोठ्याला आग लागून ४० गाई होरपळून मृत्युमुखी पडल्या. ही घटना कारंजा तालुक्यातील बिहाडी येथे अशोक भांडे यांच्या शेतात मंगळवारी दुपारी घडली.

आगीत ४० गाई होरपळल्या
>ऑनलाइन लोकमत
कारंजा (घा.)(वर्धा), दि. ७ - शेतातील गोठ्याला आग लागून ४० गाई होरपळून मृत्युमुखी पडल्या. ही घटना कारंजा तालुक्यातील बिहाडी येथे अशोक भांडे यांच्या शेतात मंगळवारी दुपारी घडली.
यामध्ये भांडे यांचे जवळपास २२ लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. अशोक भांडे यांचा दुधाचा व्यवसाय आहे. त्यांच्याकडे ४० गाई होत्या. सर्व गाई ते शेतातील गोठ्यात बांधून ठेवत असत. मंगळवारी दुपारी अचानक गोठ्याला आग लागली. ही बाब परिसरातील नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी याची माहिती भांडे यांना दिली. तसेच आग विझविण्याचाही कसोशिने प्रयत्न केला. परंतु, आग भीषण असल्याने सर्व गाई आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. यात ४० ही गाई होरपळून मरण पावल्या. घटनेची माहिती मिळताच कारंजाचे तहसीलदार मडावी यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.