वीजबळींच्या कुटुंबीयांना ४ लाख
By Admin | Updated: October 7, 2015 05:33 IST2015-10-07T05:33:47+5:302015-10-07T05:33:47+5:30
राज्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत अंगावर वीज पडून मरण पावलेल्या ६९ व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ४ लाख रुपये याप्रमाणे मदत देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला

वीजबळींच्या कुटुंबीयांना ४ लाख
- वीज पडून ६९ व्यक्तींचा मृत्यू
मुंबई : राज्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत अंगावर वीज पडून मरण पावलेल्या ६९ व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ४ लाख रुपये याप्रमाणे मदत देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी दिली.
खडसे म्हणाले की, जून महिन्यापासून आतापर्यंत राज्यात ८१ व्यक्ती पावसामुळे झालेल्या अपघातांत मरण पावल्या आहेत. त्यामध्ये अंगावर वीज पडून ६९ जण मरण पावले. गतवर्षी याच कालावधीत वीज अंगावर पडून ३१ व्यक्ती मृत्युमुखी पडल्या. हवामान खात्याने नवीन तंत्रज्ञान बसवण्याचा निर्णय घेतला असून, त्यामुळे कुठल्या परिसरात विद्युत प्रकोप होणार आहे त्याची सूचना तीन दिवस अगोदर प्राप्त होणार आहे. हे तंत्रज्ञान बसवल्यावर या परिसरातील नागरिकांना वीज कडकडू लागल्यावर झाडाखाली अथवा मोकळ्या जागेत उभे राहू नका, अशा सूचना देण्यात येतील, असे ते म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)