सांताक्रूझमध्ये सिलेंडरच्या स्फोटात ४ ठार
By Admin | Updated: July 16, 2015 15:07 IST2015-07-16T12:46:58+5:302015-07-16T15:07:42+5:30
सांताक्रूझ पूर्वेकडील गोळीबार परिसरात सिलेंडरचा स्फोट होऊन ४ जण ठार तर ३ जण जखमी झाले आहेत.

सांताक्रूझमध्ये सिलेंडरच्या स्फोटात ४ ठार
ऑनलाइन लोकमत
मुंबई,दि. १६ - सांताक्रूझ पूर्वेकडील गोळीबार परिसरात सिलेंडरचा स्फोट होऊन ४ जण ठार तर ३ जण जखमी झाले आहेत. आज सकाळी ११च्या सुमारास ही दुर्घटना घडली.
गोळीबार परिसरातील एका चाळीतील घरातील सिलेंडरचा स्फोट होऊन आग लागली आणि चौघांना आपला जीव गमवावा लागला. तर तिघे जण गंभीर जखमी झाले. जखमींपैकी एक जण ९० टक्के भाजला असून मृतांच्या संख्येत वाढ होण्याची भीती व्यक्त होत आहे. जखमींवर व्ही. एन. देसाई रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. मात्र हा स्फोट नेमका कशामुळे झाला याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मीडिया प्रतिनिधींवर हल्ला
या स्फोटाच्या वृत्तांकनासाठी गेलेल्या मीडियाच्या प्रतिनिधींवर काही स्थानिक गुंडांनी हल्ला केल्याचे वृत्त आहे. या घटनेचे वृत्तांकन करणा-या काही महिला पत्रकारांना उद्देशून बघ्यांपैकी काही जणांनी काही कॉमेंट्स केल्या, त्याबद्दल त्यांना जाब विचारला असता त्यांनी मीडिया प्रतिनिधींवर दगडफेक करत हल्ला केला. तसेच काहींचे कॅमेरे खेचून घेण्याचाही प्रयत्न केला. याप्रकरणी पोलिस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे.