शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 21:39 IST

गेल्याच आठवड्यात आठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यानंतर, महाराष्ट्र शासनाने आता आणखी चार महत्त्वाच्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत.

गेल्याच आठवड्यात आठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यानंतर, महाराष्ट्र शासनाने आता आणखी चार महत्त्वाच्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. प्रशासकीय स्तरावर आवश्यक फेरबदल करण्याच्या उद्देशाने हे निर्णय घेण्यात आले असून, यामुळे काही जिल्ह्यांमध्ये आणि शहरांमध्ये नवीन नेतृत्वाला संधी मिळणार आहे.

या बदली आदेशांनुसार, मुंबई मेट्रो क्षेत्र झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण (IAS:SCS:2014) यांची वर्धा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी वर्णी लागली आहे. पराग सोमण हे प्रशासकीय कामात निष्णात मानले जातात आणि त्यांच्यावर आता वर्ध्याच्या ग्रामीण विकासाची महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

दुसरीकडे, अमरावती महानगरपालिकेचे विद्यमान आयुक्त सचिन कळंत्रे (IAS:SCS:2014) यांची बदली करण्यात आली आहे. त्यांना आता पुण्यातील महाराष्ट्र प्रशासकीय प्रशिक्षण संस्था (यशदा) येथे उपमहासंचालकपदाची जबाबदारी सांभाळावी लागणार आहे. पुणे येथील यशदा ही प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी महत्त्वाची संस्था आहे.

नागपूर स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या सौम्या शर्मा-चांडक (IAS:RR:2018) यांना अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्तपदाची मोठी जबाबदारी मिळाली आहे. अमरावती शहराच्या विकासाची आणि प्रशासकीय कारभाराची धुरा आता त्यांच्या खांद्यावर असणार आहे. सौम्या शर्मा चांडक या त्यांच्या कार्यक्षमतेसाठी ओळखल्या जातात. 

या बदल्यांमध्ये वर्धा जिल्हा परिषदेचे विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी जिथिन रहमान (IAS:RR:2020) यांचीही बदली झाली आहे. त्यांना आता बीड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

या बदल्यांमुळे राज्याच्या प्रशासनात काही प्रमाणात फेरबदल होणार असून, या बदल्या प्रशासकीय कामकाजात नवीन ऊर्जा आणण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे दिसून येते.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रGovernmentसरकार