मलकापूरच्या व्यापा-याकडून ४ कोटीची रक्कम जप्त
By Admin | Updated: November 12, 2016 19:30 IST2016-11-12T19:30:03+5:302016-11-12T19:30:03+5:30
मध्यप्रदेशमध्ये ४ कोटी रुपये घेवून जात असताना मलकापूर येथील व्यापा-याकडून ४ कोटीची रक्कम मध्यप्रदेश पोलिसांनी जप्त केली.

मलकापूरच्या व्यापा-याकडून ४ कोटीची रक्कम जप्त
>ऑनलाइन लोकमत
खामगाव, दि. १२ - मध्यप्रदेशमध्ये ४ कोटी रुपये घेवून जात असताना मलकापूर येथील व्यापा-याकडून ४ कोटीची रक्कम मध्यप्रदेश पोलिसांनी जप्त केली. ही घटना शुक्रवारी रात्री घडली.
मलकापूर येथील व्यापारी शब्बीर हुसेन हे शुक्रवारी मलकापूर येथून मध्यप्रदेशातील ब-हानपूर येथे कार क्रमांक एम.एच.२८ एएन २१५३ ने जात होते. दरम्यान महाराष्ट्र -मध्यप्रदेश सीमेवरील अंतुर्ली फाटा येथे मध्यप्रदेश पोलिसांनी शब्बीर हुसेन यांची कार थांबवून चौकशी केली. यादरम्यान पोलिसांनी शब्बीर हुसेन यांच्या कारची तपासणी केली असता कारमध्ये तीन सुटकेसमध्ये एक हजार रुपयांच्या नोटांची बंडल आढळून आली.
मध्यप्रदेश पोलिसांनी ही ४ कोटीची रक्कम जप्त करुन चौकशीकामी शब्बीर हुसेन यांना ताब्यात घेतले. दोन राज्याच्या या सीमेवर पोलिसांची नियमित तपासणी सुरु असते. या घटनेनंतर या रस्त्याने जाणाºया वाहनांची पोलिसांकडून कसून तपासणी करण्यात येत असून शनिवारी दुसºया दिवशीही वाहनांची तपासणी सुरुच होती.