सचिनकडून डोणजा गावाच्या विकासासाठी ४ कोटी
By Admin | Updated: February 14, 2017 19:56 IST2017-02-14T19:56:53+5:302017-02-14T19:56:53+5:30
डोणजा गावाच्या विकासासाठी खासदार निधीतून सचिनने ४ कोटी रुपये मंजूर केले आहेत.

सचिनकडून डोणजा गावाच्या विकासासाठी ४ कोटी
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 14 - राज्यसभेतील खासदार आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने संसद आदर्श गाव योजनेअंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यातील डोणजा हे गाव दत्तक घेतले आहे. त्या डोणजा गावाच्या विकासासाठी खासदार निधीतून सचिनने ४ कोटी रुपये मंजूर केले आहेत.
या निधीच्या माध्यमातून गावातील विकासाची विविध कामे करण्यात येणार आहेत. गावातील शाळेची इमारत बांधणी, पाणीपुरवठा योजना, चांगले रस्ते, सांडपाण्याचा मार्ग आदी कामे करण्यात येणार असल्याबाबत एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, संसद आदर्श गाव योजनेअंतर्गत याआधी सचिनने आंध्रप्रदेशमधील पुत्तमराजू कंद्रिगा हे गाव दत्तक घेतले आहे.