शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

394 पोलीस उपनिरीक्षक सेवेत; १२० व्या सत्राचा दीक्षान्त : शीतल टेंभे सर्वोत्तम प्रशिक्षणार्थीची मानकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2022 11:01 IST

सर्वाधिक २०६ अधिकारी पश्चिम महाराष्ट्रातील असून, त्यानंतर मराठवाड्यातील ११०, विदर्भ ४७, उत्तर महाराष्ट्र २२ व कोकणातील ९ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

नाशिक : महाराष्ट्र पोलीस अकॅडमीमधील १२० व्या सत्रातील एक वर्षाचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांचा दीक्षान्त सोहळा शनिवारी पार पडला. महाराष्ट्र पोलीस अकॅडमीचे संचालक राजेश कुमार यांनी या दीक्षान्त सोहळ्यात प्रशिक्षणार्थींना शपथ दिल्यानंतर ३९४ पोलीस उपनिरीक्षकांची पोलीस तुकडी राज्याच्या सेवेत दाखल झाली आहे. यात सर्वाधिक २०६ अधिकारी पश्चिम महाराष्ट्रातील असून, त्यानंतर मराठवाड्यातील ११०, विदर्भ ४७, उत्तर महाराष्ट्र २२ व कोकणातील ९ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

प्रशिक्षणादरम्यान सर्वाधिक गुणांसह सर्वोत्तम प्रशिक्षणार्थींचा सन्मान मिळविणाऱ्या शीतल टेंभे यांना यशवंतराव चव्हाण सुवर्ण चषक व सिल्व्हर बटन आणि मानाची रिव्हॉल्व्हर देऊन गौरविण्यात आले, तर द्वितीय क्रमांकावर असलेल्या संध्याराणी देशमुख यांना सर्वोत्तम महिला प्रशिक्षणार्थी पारितोषिकासह अहिल्याबाई होळकर चषक प्रदान करून गौरविण्यात आले. पारितोषिक वितरण सोहळ्यानंतर द्वितीय क्रमांकावरील सर्वोत्तम प्रशिक्षणार्थी संध्याराणी देशमुख यांच्या नेतृत्वात १२० व्या सत्रातील प्रशिक्षणार्थींनी निष्क्रमण संचलन करीत अकादमीचा निरोप घेतला.

सोलापूरला मानाचे स्थान -महाराष्ट्र पोलीस अकॅडमीत गत वर्षभरातील प्रशिक्षणादरम्यान ३९४ प्रशिक्षणार्थींमधून सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील सावडी येथील शीतल टेंभे हिने सर्वाधिक गुण मिळवून सर्वोत्तम प्रशिक्षणार्थी होण्याचा मान मिळवत मानाची रिव्हॉल्व्हर पटकावली, तर करमाळा तालुक्यातील वांगी नं. २ येथील संध्याराणी देशमुख यांनी द्वितीय सर्वोत्तम प्रशिक्षणार्थीचा मान मिळविला. विशेष म्हणजे संध्याराणी देशमुख यांना द्वितीय पारितोषिक मिळाले असले तरी त्यांनी दीक्षान्त संचलनात २७८ पुरुष व ११६ महिला असे सर्व ३९४ प्रशिक्षणार्थींचे नेतृत्व करीत सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. 

टॅग्स :PoliceपोलिसMaharashtraमहाराष्ट्रState Governmentराज्य सरकार