सृधारगृहाची तोडफोड करुन ३८ महिला पळाल्या

By Admin | Updated: December 9, 2015 11:10 IST2015-12-09T11:01:40+5:302015-12-09T11:10:07+5:30

पुणे जिल्ह्यतील वानवडीमधील महिला सृधारगृहात ठेवण्यात आलेल्या ३८ महिला सृधारगृहाची तोडफोड करुन तिथून पसार झाल्या होत्या.

38 women fled from the building | सृधारगृहाची तोडफोड करुन ३८ महिला पळाल्या

सृधारगृहाची तोडफोड करुन ३८ महिला पळाल्या

ऑनलाइन लोकमत 

पुणे, दि. ९ - पुणे जिल्ह्यातील वानवडीमधील महिला सृधारगृहातून पसार झालेल्या ३८ महिलांपैकी १८ महिलांना पकडण्यात आलं आहे. २० महिलांचा अद्यापही शोध लागलेला नाही. १० महिलांना हडपसर येथून तर, आठ महिलांना पुलगेट परिसरातून अटक करण्यात आली. चांगले जेवण मिळत नाही, नातेवाईकांशी बोलता येत नाही अशा तक्रारी या महिलांकडून करण्यात आल्या होत्या. 

मात्र तक्रार करुनही काहीच फरक पडत नसल्याने अखेर मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास या महिलांनी कार्यालयातील संगणक, टेबल, खुर्च्यांची तोडफोड करुन तिथून पसार झाल्या. सुधारगृहातून पळून गेलेल्या महिलांमध्ये बांगलादेशी महिलांचाही समावेश आहे. वानवडी पोलिसांनी या प्रकरणी तक्रार दाखल करुन बेपत्ता महिलांचा शोध सुरु केला आहे. 

Web Title: 38 women fled from the building