गणेशोत्सवासाठी ३८ स्पेशल जादा गाड्या सोडणार

By Admin | Updated: August 21, 2016 02:01 IST2016-08-21T02:01:23+5:302016-08-21T02:01:23+5:30

गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे आणि मध्य रेल्वे आणखी ३८ जादा स्पेशल ट्रेन चालवणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस ते रत्नागिरी, लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमाळी

38 more special trains to leave for Ganeshotsav | गणेशोत्सवासाठी ३८ स्पेशल जादा गाड्या सोडणार

गणेशोत्सवासाठी ३८ स्पेशल जादा गाड्या सोडणार

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे आणि मध्य रेल्वे आणखी ३८ जादा स्पेशल ट्रेन चालवणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस ते रत्नागिरी, लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमाळी आणि करमाळी ते पनवेल या मार्गावर स्पेशल ट्रेन चालविण्यात येतील. यापूर्वी १४२ स्पेशल ट्रेन सोडण्यात आल्या असून, ३८ जादा ट्रेनमुळे गाड्यांची संख्या १८० वर पोहोचली आहे. दरम्यान, लोकमान्य टिळक टर्मिनस ते रत्नागिरी या गाडीच्या ३० फेऱ्या चालवण्यात येतील. ही ट्रेन २ ते २१ सप्टेंबरदरम्यान आठवड्यातील पाच दिवस (सोमवार आणि गुरुवार वगळता) धावेल. (प्रतिनिधी)

Web Title: 38 more special trains to leave for Ganeshotsav