शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

३६ विद्यार्थिनींना विषबाधा

By admin | Updated: March 16, 2016 08:37 IST

कामोठे येथील एमजीएम नर्सिंग महाविद्यालयातील ३६ विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा झाली आहे. त्यांना उपचारार्थ एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले.

कळंबोली : कामोठे येथील एमजीएम नर्सिंग महाविद्यालयातील ३६ विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा झाली आहे. त्यांना उपचारार्थ एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. रविवारी रात्री घडलेला हा प्रकार व्यवस्थापनाने दाबून ठेवला होता. विद्यार्थिनींच्या पालकांनी याबाबत पोलिसांना कळवल्यावर विषबाधेचा प्रकार उघड आला. याबाबत कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ममता डिसोजा यांनी सांगितले.पनवेल - सायन महामार्गालगत महात्मा गांधी मिशनचे रुग्णालय आणि शैक्षणिक संकुल आहे. या ठिकाणी अभियांत्रिकी, वैद्यकीय त्याचबरोबर नर्सिंग महाविद्यालय आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातील विद्यार्थी येथील वसतिगृहात राहून शिक्षण घेत आहेत. नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी रविवारी महाविद्यालयाच्या मेसमध्ये रात्री जेवण केले. मात्र त्यापैकी ३६ जणींना पहाटे उलट्या, मळमळणे, जुलाब असा त्रास सुरू झाला. त्यापैकी दोघींची प्रकृती गंभीर आहे, तर २४ विद्यार्थिनींची प्रकृती स्थिर आहे. उर्वरित मुलींना डिसचार्ज देण्यात आला आहे. रात्रीच्या जेवणात विद्यार्थिनींनी भात, भाजी, जिलेबी खाल्याची माहिती पुढे येत आहे. विद्यार्थिनींना झालेल्या विषबाधेबाबत व्यवस्थापनाने कमालीची गुप्तता पाळली. सोमवारी रात्रीपर्यंत याबाबत माहिती बाहेर आली नाही. हे प्रकरण दडपण्याचा व्यवस्थापनाचा प्रयत्न काही पालकांनी उधळून लावला. त्यांनी याबाबत पोलिसांना कळवले. केरळच्या काही स्थानिक संघटनांनी याबाबत तक्रार केल्यावर मंगळवारी सकाळी कामोठे आणि खान्देश्वर पोलिसांच्या पथकाने एमजीएम रुग्णालयात धाव घेतली आणि या प्रकरणाची चौकशी सुरू केली. तेव्हा हा प्रकार समोर आला. पायाभूत सुविधांचा अभाव, भरमसाठ शुल्कवाढ त्याचबरोबर वर्ग खोल्यांमध्ये अपुऱ्या सोयी-सुविधांमुळे गेल्या २-३ वर्षांपासून कामोठेतील एमजीएम महाविद्यालय चर्चेत आहे. आता नर्सिंगच्या विद्यार्थिनींना झालेल्या विषबाधेमुळे व्यवस्थापनाचे धाबे दणाणले आहे. निकृष्ट जेवणखानावळचालकाने निकृष्ट दर्जाचे अन्न विद्यार्थिनींना दिल्यामुळे हा प्रकार घडला असल्याचा आरोप विद्यार्थी संघटनांनी केला आहे. त्याचबरोबर पालक आणि शैक्षणिक संकुलातील इतर विद्यार्थ्यांनी याबाबत तीव्र प्रतिक्रि या नोंदवल्या आहेत. याबाबत महाविद्यालयातून प्रतिक्रि या मिळू शकली नाही. मंगळवारी सकाळी नर्सिंग महाविद्यालयातील विषबाधेचा प्रकार उघडकीस आला. त्यानुसार आम्ही चौकशी करीत आहोत. या प्रकरणी नेमके दोषी कोण याबाबत आताच सांगणे कठीण आहे. मात्र जे कोणी या घटनेत दोषी आहेत, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. - ममता डिसोजा, पोलीस निरीक्षक, कामोठे