शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

सिंधुदुर्गात ३६ कोटींची कर्जमाफी, १७ हजार, ८६३ शेतक-यांना मिळाला लाभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2017 19:18 IST

सिंधुदुर्गनगरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अर्थात राज्यातील ऐतिहासिक कर्जमाफी अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १७ हजार ८६३ शेतक-यांना ३५ कोटी ९२ लाख ४0 हजार २ रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे.

सिंधुदुर्गनगरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अर्थात राज्यातील ऐतिहासिक कर्जमाफी अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १७ हजार ८६३ शेतक-यांना ३५ कोटी ९२ लाख ४0 हजार २ रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतील १५ हजार ४३५ लाभार्थींना २६ कोटी २५ लाख १७ हजार ७८७ रुपये रकमेचा लाभ तर विविध बँकामधील २४२८ लाभार्थ्यांना ९ कोटी ६७ लाख २२ हजार २१५ रुपये रकमेचा लाभ मिळाला आहे, अशी माहिती सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक मेधा वाके यांनी दिली.राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर केली. या योजनेंतर्गत थकबाकीदार शेतक-यांना त्यांचे थकीत खाते पूर्ववत करण्यासाठी व ज्या शेतक-यांनी आपले खाते नियमित ठेवले आहे. अशा शेतक-यांना प्रोत्साहनपर रक्कम म्हणून मदत केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात या योजनेची अंमलबजावणी चालू असून, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस ७ डिसेंबर रोजीपर्यंत प्राप्त झालेल्या ग्रीन लिस्टनुसार ४ हजार १८ थकबाकीदार शेतक-यांना ११ कोटी ४३ लाख १५ हजार ७४२ इतकी रक्कम तर ११ हजार ४१७ शेतक-यांना प्रोत्साहनपर लाभ योजनेअंतर्गत १४ कोटी ८२ लाख २ हजार ४५ अशा एकूण १५ हजार ४३५ लाभार्थ्यांना २६ कोटी २५ लाख १७ हजार ७८७ इतक्या रकमेचा लाभ देण्यात आला आहे.बँक आॅफ इंडिया कर्ज माफीस पात्र लाभार्थी ७४६ रक्कम ३ कोटी ४२ लाख १५ हजार रुपये, प्रोत्साहनपर लाभार्थी ८४२ रक्कम २ कोटी १६ लाख ४५ हजार, बँक आॅफ महाराष्ट्र ४६ लाभार्थी रक्कम २९ लाख २८ हजार रुपये, सेन्ट्रल बँक आॅफ इंडिया १८ लाभार्थी रक्कम ९ लाख १ हजार रुपये, कॉर्पोरेशन बँक प्रोत्साहनपर लाभाचे लाभार्थी ३७ रक्कम ४ लाख १५ हजार रुपये. स्टेट बँक आॅफ इंडिया ५९ लाभार्थी रक्कम ३२ लाख ९८ हजार ७३0 रुपये, देना बँक प्रोत्साहनपर २६ लाभार्थी रक्कम ८ लाख ४५ हजार रुपये, सिंडीकेट बँक १९ लाभार्थी रक्कम ७ लाख ७१ हजार रुपये व प्रोत्साहनपर लाभार्थी ७ रक्कम ९५ हजार रुपये. युको बँक प्रोत्साहनपर ८ लाभार्थी रक्कम १ लाख ४५ हजार रुपये, युनिअन बँक आॅफ इंडिया कर्जमाफीस पात्र लाभार्थी ४८ रक्कम १३ लाख ६ हजार रुपये व प्रोत्साहनपर लाभार्थी २१0 रक्कम ४७ लाख ३२ हजार रुपये, विदर्भ कोकण ग्रामीण बँक कर्जमाफीस पात्र लाभार्थी ३६0 रक्कम २ कोटी ४९ लाख ८0 हजार ४८५ रुपये व प्रोत्साहनपर ३२ लाभार्थी रक्कम ४ लाख ४५ हजार.७ डिसेंबरच्या शासन निर्णयानुसार मुद्दल व व्याजासह १ लाख ५0 हजार रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतक-यांसाठी एक वेळ समझोता योजना (ओटीएस) जाहीर करण्यात आली आहे. पात्र शेतक-यांनी त्यांच्या हिश्श्याची १ लाख ५0 हजारांपेक्षा जास्त असलेली संपूर्ण रक्कम ३१ मार्च २0१८ पर्यंत बँकेत जमा केल्यावर शासनातर्फे १ लाख ५0 हजार रुपये लाभांची रक्कम शेतक-यांना संबंधित बँकामार्फत अदा करण्यात येणार आहे. अशी माहिती सहकारी उपनिबंधक कार्यालयातून देण्यात आली.आतापर्यंत राज्यात ४१ लाख शेतक-यांना लाभछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत आतापर्यंत राज्यात साधारण ४१ लाख शेतक-यांना कर्जमाफीसाठी १९ हजार कोटी रुपयांची रक्कम बँकाकडे वर्ग करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत ७७ लाख अर्ज प्राप्त झाले होते. छाननी अंतर्गत डुप्लीकेशन झालेले खाते दूर करुन ६९ लाख खात्यांवर कर्जमाफीची रक्कम जमा करण्याची कार्यवाही सुरु आहे. त्यापैकी जवळपास ४१ लाख खात्यांमध्ये कर्जमाफीचे अनुदान देण्यासाठी राज्य शासनाकडून बँकाकडे सुमारे १९ हजार कोटी रुपये इतका निधी हस्तांतरीत करण्यात आला आहे. शेवटच्या पात्र शेतक-याला मदत मिळेपर्यंत ही योजना सुरु ठेवली आहे.कर्जमाफीचा लाभ घ्यासदरच्या वाढीव मुदतीचा लाभ घ्या. तसेच एक वेळ समझोता योजने अंतर्गत येणा-या शेतक-यांनी आपल्या हिश्श्यांची रक्कम लवकरात लवकर भरून १ लाख ५0 हजार रुपया पर्यंतचा कर्जमाफीचा लाभ घ्यावा- मेधा वाके, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सिंधुदुर्ग

टॅग्स :Farmerशेतकरीsindhudurgसिंधुदुर्ग