शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ३५ राज्य वाङ्मय पुरस्कार होणार प्रदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2018 18:49 IST

२७ फेब्रुवारी हा ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या कुसुमाग्रजांचा जन्मदिन म्हणजेच मराठी भाषा गौरव दिन !  याही वर्षी मराठी भाषा गौरव दिन महाराष्ट्र शासनातर्फे भव्य आणि विविधांगी कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात येणार आहे.

मुंबई- २७ फेब्रुवारी हा ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या कुसुमाग्रजांचा जन्मदिन म्हणजेच मराठी भाषा गौरव दिन !  याही वर्षी मराठी भाषा गौरव दिन महाराष्ट्र शासनातर्फे भव्य आणि विविधांगी कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात येणार आहे. उद्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह येथे सायंकाळी ६.०० वाजता साहित्य व भाषाविषयक पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला असून, या कार्यक्रमात मराठी भाषा विभागाचे सर्वोच्च पुरस्कार प्रदान करण्याबरोबरच, मराठी भाषा हे मध्यवर्ती सूत्र असलेला सांगीतिक कार्यक्रमही सादर करण्यात येणार आहे. तसेच विविध साहित्य प्रकारांचे ३५ राज्य वाङ्मय पुरस्कारही प्रदान करण्यात येणार आहेत. याच कार्यक्रमात गेल्या वर्षभरातील साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या मराठी साहित्यिकांचा विशेष सन्मानही करण्यात येणार आहे.या वर्षीचा कविवर्य विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार मधु मंगेश कर्णिक यांना,  पु. भागवत स्मृती उत्कृष्ट प्रकाशन पुरस्कार पुणे येथील वरदा प्रकाशनाला, डॉ. अशोक केळकर भाषाअभ्यासक पुरस्कार अविनाश बिनीवाले यांना आणि कविवर्य मंगेश पाडगावकर भाषासंवर्धक पुरस्कार मराठी विज्ञान परिषद या संस्थेला पुरस्कार वितरित केले जाणार आहेत. 

पुरस्कार सोहळ्यादरम्यान सुप्रसिद्ध कलाकार रवींद्र साठे, उत्तरा केळकर यांच्यासह अनेक प्रथितयश कलाकारांनी ‘मराठीच्या पोतडीतून’ हा मराठी भाषेची वैशिष्ट्ये सांगणारा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. तसेच या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या 15 दर्जेदार पुस्तकांचे प्रकाशनही करण्यात येणार आहे. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरमध्येही ‘अमृताचिये मराठी’ या कार्यक्रमाद्वारे मराठी भाषा दिन साजरा केला जाणार आहे. यात पुरुषोत्तम बेर्डे यांच्यासह अनेक प्रथितयश कलाकार सहभागी होतील. महाराष्ट्रातील अकरा (११) विद्यापीठांच्या माध्यमातून राज्यातील विविध शहरांत मराठी भाषेची स्थित्यंतरे दर्शविणारे दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रम मराठी रसिकांसाठी सादर करतील. ह्या विविध कार्यक्रमांत सुमारे ५०० प्रथितयश कलाकारांचे हजारो रसिक श्रोत्यांच्या उपस्थितीत सादरीकरण होणार आहे.

टॅग्स :MumbaiमुंबईMarathi Language Day 2018मराठी भाषा दिन 2018