शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

पश्चिम विदर्भातील प्रकल्पांकरिता ३५ हजार हेक्टर भूसंपादन बाकी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2019 19:40 IST

अमरावती विभागातील मोठे, मध्यम व लघु प्रकल्पांकरिता ४९ हजार ६६४.३१ हेक्टर भूसंपादनाची आवश्यकता आहे. अद्यापही ३५ हजार ३८६.६५ हेक्टर भूसंपादन बाकी असल्याची माहिती वरिष्ठ अइभयंत्यांनी दिली. 

- संदीप मानकर अमरावती  - विभागातील मोठे, मध्यम व लघु प्रकल्पांकरिता ४९ हजार ६६४.३१ हेक्टर भूसंपादनाची आवश्यकता आहे. अद्यापही ३५ हजार ३८६.६५ हेक्टर भूसंपादन बाकी असल्याची माहिती वरिष्ठ अइभयंत्यांनी दिली. अमरावती विभागातील भूसंपादनाच्या प्रकल्पांमध्ये अनुशेषांतर्गत व अनुशेषबाह्य प्रकल्पांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. अनुशेषांतर्गत मोठे, मध्यम व लघु प्रकल्पांकरिता ३५ हजार ६११.७५ हेक्टर भूसंपादनाची आवश्यकता होती. यापैकी १२ हजार १८४.६ हेक्टर भूसंपादन सरळ खरेदी पद्धतीने करण्यात आले. १३ हजार ५९०.१५ हेक्टर भूसंपादन प्रक्रियेव्दारे करण्यात आले, तर १४ हजार २९५.९४ हेक्टर भूसंपादन शिल्लक आहे. शिल्लक असलेल्या भूसंपादनामध्ये अंतिम टप्प्यातील प्रस्तावित भूसंपादनात १२५.४४ हेक्टर भूसंपादन  सरळ खरेदी पद्धतीने करण्यात येणार असून, ३,१०४.८२ हेक्टर भूसंपादन  प्रक्रियेव्दारे करण्यात येणार आहे. यामध्ये प्राथमिक टप्प्यातील भूसंपादनाच्या प्रस्तावात सरळ खरेदी ही २८३.२८ हेक्टर आहे. ८८२५.०७ हेक्टर भूसंपादन प्रक्रियेव्दारे करण्यात येणार आहे. १५०२.४७ हेक्टरचे प्रस्तावच सादर झाले  नसल्याची माहिती पुढे आली आहे. अनुशेषाबाह्य मोठे, मध्यम व लघु प्रकल्पांमध्ये एकूण ५,११०५.४३ हेक्टर भूसंपादनाची आवश्यक्ता होती. त्यामध्ये सरळ खरेदीने ३,१४६.५४ हेक्टर भूसंपादन करण्यात आले आहे. २६८६६.८२ प्रक्रियेव्दारे करण्यात आले आहे. असे एकूण  ३० हजार १३.५६ हेक्टर भूसंपादन करणे गरजेचे होते. यामध्ये २१ हजार ९०.७१ हेक्टर भूसंपादन शिल्लक आहे. त्यापैकी अंतीम टप्पयातील प्रस्तावित क्षेत्र भूसंपादनामध्ये सरळ खरेदीने ६०० हेक्टर, तर प्रक्रियेव्दारे ५६२.९९ हेक्टर व प्राथमिक टप्प्यातील प्रस्ताव क्षेत्रामध्ये सरळ खरेदीने ५२.६२ हेक्टर आणि प्रक्रियेव्दारे १९,१६५.८९ हेक्टर भूसंपादन प्रस्तावित आहे. यामध्ये एकूण ७७७.१३ हेक्टरचा अद्याप प्रस्तावच सादर केला नसल्याची बाब पुढे आली आहे. अनुशेषांतर्गत व अनुशेषबाह्य असे २७३३.१२ हेक्टरचा प्रस्तावच दाखल झाला नसल्याची बाब पुढे आली आहे. काही प्रकल्पांचे कालव्याऐवजी पाईप डिस्ट्रीबुशनव्दारे योजना राबविणे प्रस्तावित असल्याने हे भूसंपादन प्रक्रिया करण्यात आली नसल्याची माहिती आहे. 

जीगाव प्रकल्पांचे सर्वाधिक भूसंपादन अनुशेष  बिगर अनुशेषांतर्गत एकूण ७ मोठे, १२ मध्यम व ९२ लघु असे एकूण १११ प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. त्याकरिता भूसंपादन करण्यात येत असून बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील जीगाव हा मोठा प्रकल्प असून, याकरिता सर्वाधिक भूसंपादन करण्यात येत आहे. त्याचा प्रस्ताव शासनास सादर असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिका-यांनी दिली.

टॅग्स :Vidarbhaविदर्भMaharashtraमहाराष्ट्र